Nashik Drugs Politics : ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित राजकीय ‘बडी भाभी’ कोण?

Drugs Mafia and Political Connection : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी व आर्थिक व्यवहारातील राजकीय नेत्यांच्या तपासाबाबत पोलिस उदासीन
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nashik Latest News : सहा आमदारांना ड्रग्जमाफियांकडून पैसे मिळत होते. यामध्ये एक आमदार सत्ताधारी गटाशी संबंधित बडी भाभी असल्याचा उल्लेख खासदार संजय राऊत यांनी केला होता. (Will Police do a serious investigation in Drugs & Political connectio)

ड्रग्ज प्रकरण राज्यभर (Maharashtra) चर्चेत आले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असूनही त्यात मुंबई (Mumbai) पोलिसांनी (Police) नाशिकमध्ये (Nashik) कारवाई केली. ड्रग्ज प्रकरणात थेट पोलिस आणि राजकीय नेते लाभार्थी असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Drugs Mafia : मुंबई पोलिसांना गिरणा नदीत सापडले १५ कोटींच्या ड्रग्जचे घबाड!

अमली पदार्थाच्या तपासात मुंबई पोलिसांनी घेतलेला वेग पाहता, त्याची पाळेमुळे अगदी नाशिक शहर आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे आढळले. त्यामुळे केवळ पैशांसाठी युवा पिढीला धोक्यात घालणाऱ्यांवर गंभीर कारवाईची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने नाशिक पोलिस फारशी कारवाई करताना दिसत नाही. त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही, असे सध्याचे चित्र आहे.

शिवसेना प्रतोद, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात शिवसेनेचा प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये खासदार राऊत यांनी सहा आमदारांना ड्रग्ज प्रकरणातून पैसे दिले जात होते. त्यात राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नाशिकची एक बडी भाभी असल्याचा गंभीर आरोप केला होता.

ड्रग्ज आणि राजकीय नेते यांच्यात अतिशय घृणास्पद संबंध आढळल्याने पोलिस कोणत्या राजकीय नेत्याला ड्रग्ज व्यवसायातून पैसे मिळत होते, याचा तपास करतील का?, सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली तपास अर्धवट सोडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत वडाळा येथील छोटी भाभी या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी संबंध असल्याचे एक आमदार तसेच अन्य राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

Sanjay Raut
Balasaheb Thackeray On Sharad Pawar: मैद्याचं पोतं, म्हमद्या अन् शरद पवार...मैत्रीचं अनोखं नातं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com