Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड उद्या गुरूवारी राजकीय घडामोडीचे केंद्र असणार आहे. भाजप नेते आमदार राम शिंदे यांचा दिवाळी फराळ, धनगर समाजाचे आरक्षणाचे आंदोलन आणि आमदार रोहित पवार यांची सभा, असा राजकीय घमासान असणार आहे.
यात राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे, पार्थ पवार यांची उपस्थिती. तशी चर्चा रंगली असून, समाज माध्यमांवर ग्राफिक्स व्हायरल झाले आहेत. यामुळे ऐन थंडीत कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण तापणार असे दिसत आहे
भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उद्या गुरूवारी दिवाळी फराळाची जोरदार तयारी केली आहे. दिवाळी फराळाच्या गोड कार्यक्रमात फटाके मीच वाजवणार, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. दिवाळी फराळाच्या आमंत्रणाचे ग्राफिक्स समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा आणि आमदार राम शिंदे यांचे छायाचित्र मोठे वापरले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पार्थ पवार यांच्या नावासमोर महाराष्ट्राचे युवा उदयमुख नेतृत्व असा उल्लेख केला आहे. अहिल्यानगरी (चोंडी) येथे हार्दिक स्वागत, असाही उल्लेख ग्राफिक्सवर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डाॅ. सुजय विखे यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. प्रा. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कुटुंबियांनाच आमंत्रण दिले आहे. यात सुमित्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी जिल्ह्यातील सर्वाच प्रमुखांना आमंत्रित केले आहे. यात भाजप, काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदार, पदाधिकारी यांचा देखील समावेश आहे. मोहटा देवी दर्शनासाठी वाहनातून एकत्र प्रवास करणारे आमदार नीलेश लंके यांना देखील विशेष आमंत्रण आहे. एकीकडे दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाची लगबग असणार असून, दुसरीकडे धनगर आरक्षणावर समाज आंदोलनाला सुरूवात करणार आहे.
याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सभा आयोजित केली आहे. या सभेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे येणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व राजकीय घमासानमुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाणार आहे.
भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी पार्थ पवार यांची उपस्थित म्हणजे, आमदार रोहित पवार यांना शह असल्याचे बोलले जात आहे. राम शिंदे यांनी पार्थ पवार यांना बोलावून रोहित पवार यांच्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच, कर्जत-जामखेडमध्ये पवार कुटुंब पुन्हा आमने-सामने दिसणार असल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने आमदार राम शिंदे हे टायमिंग साधत असल्याची चर्चा आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.