Rohit Pawar Vs Nilesh Lanke: नीलेश लंकेंच्या अंगणात रोहित पवारांनी फोडला बॉम्ब; भाऊबीजेतून विजय औटींचं लाँचिंग!

Parner Assembly : विधानसभेसाठी लंकेंविरोधात विजय औटींच्या नावाची चर्चा
Rohit Pawar, Vijay Auti, Nilesh Lanke
Rohit Pawar, Vijay Auti, Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आमदार नीलेश लंके यांच्या पारनेरमध्ये महिलांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील महिलांना मोठ्या संख्येने एकत्र करण्याचे दिव्य असणार आहे. याचे सर्व नियोजन पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्याकडे असल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. विजय औटी हे आमदार लंके यांचे विश्वासू सहकारी राहिलेले आहेत. त्यामुळे लंकेच्या पारनेरमध्ये भाऊबीजेतून रोहित पवार आता विजय औटींचे लॉन्चिंग करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या रूपाने उभी फूट पडली. यात राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यात पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचाही समावेश आहे. ते आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही जोरदार तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आमदार लंके यांचे निकटचे विश्वासू सहकारी राहिलेले माजी नगराध्यक्ष औटी यांच्याशी दुरावा निर्माण झाला. यास पारनेर शहरातील नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल हे निमित्त ठरल्याची चर्चा आहे.

Rohit Pawar, Vijay Auti, Nilesh Lanke
Marathwada Water Issue: न्यायालयाच्या निकालापर्यंत नाशिकहून पाणी न सोडण्याचा निर्धार!

आता पुढील वर्षी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून हक्काच्या जागांवर संभाव्य उमेदवार निवडावे लागणार आहेत. आमदार नीलेश लंके हे येणाऱ्या काळात कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र, मध्यंतरी त्यांनी अजित पवार देतील तो आदेश मान्य करून, लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे.

Rohit Pawar, Vijay Auti, Nilesh Lanke
Kalyan Politics : वडील मुख्यमंत्री असल्याने तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा; गणपत गायकवाडांचा श्रीकांत शिंदेंना टोला

आमदार लंके यांचे अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी जवळीक राहिली आहे. मात्र, त्यांनी मतदारसंघातील विकासकामांच्या निधीचे कारण पुढे करत सत्तेतील अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र, आता निवडणुका जवळ येत असल्याने नीलेश लंके अजित पवार यांच्यासोबतच राहणार की शरद पवार गटाला साथ देणार, अशीही चर्चा सध्या आहे.

या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यासह नगर जिल्ह्यात जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात पारनेरमध्ये त्यांनी बुधवारी भाऊबीजेनिमित्त महिलांचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन नीलेश लंके यांच्यापासून दुरावलेले विजय औटी यांच्याकडे आहे. यातूनच विजय औटी हे येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar, Vijay Auti, Nilesh Lanke
MLA Prakash Awade News : स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांना आमदार आवाडेंनी दिली उद्धट उत्तरे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com