Pankjatai Munde
Pankjatai Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankja Munde; पंकजाताई मुंडे यांचे भाषण नागरिकांनी भरपावसात ऐकले!

Sampat Devgire

सिन्नर : (Sinner) लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कार्यक्रम सुरु असतानाच पाऊस सुरु झाला. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित पावसात देखील थांबून राहिले. त्यामुळे त्यांचे भाषण चर्चेचा विषय ठरला, (Followers shout slogans for Pankja Munde In Sinner)

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नांदूर शिंगोटे (सिन्नर) येथे झाले.

या वेळी पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु असताना पाऊस होता. हा संदर्भ घेत त्यांनी हा पाऊस दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आशीर्वाद असल्याचे सांगताच उपस्थितांनी घोषणा दिल्या. त्यांनी माझ्या नावाच्या घोषणा नका देऊ, आता उपस्थित प्रत्येक नेत्याच्या नावाच्या घोषणा द्या, असे सांगितले. त्यामुळे त्यांचे हे वाक्य देखील एक वेगळा राजकीय संदर्भ देऊन गेले.

स्मारकाच्या लोकार्पणावेळी त्या भावुक झाल्या होत्या. त्यांनी (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने आव्हानांना सामोरे जात राजकीय वाटचाल केली. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांबाबत अत्यंत सजग असायचे. ऊसतोड मजूरांसह समाजासाठी त्यांनी केलेले काम समाजापुढे आहे. त्यामुळेच आजही लोक त्यांना विसरलेले नाहीत.

यावेळी त्यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे ऊसतोड मजूरांच्या कामगारांच्या मुलासाठी प्रत्येक शहरात वसतिगृह व दवाखाने काढण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे काम नक्कीच युद्धपातळीवर पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, राधाकृष्ण गमे, आमिशा मित्तल, शीतल सांगळे, प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT