Ambadas Danve Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambadas Danve News: शाईफेक कशामुळे झाली याचाही विचार करणार की नाही?

गद्दारांच्या मदीतसाठी केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे.

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सत्तेवर ठेवावे, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे (BJP) तत्कालीन नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना केली होती. ते नेतृत्व आता शिवसेनेच्या (Shivsena) गद्दारांच्या पाठीवरून हात फिरवत आहे. गद्दार आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज येथे केली. (Ambadas Danve criticise Central agencies on support to Shivsena rebel)

शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी श्री. दानवे नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याची टीका केली.

श्री. दानवे म्हणाले, की अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला. केंद्रीय यंत्रणांचा केंद्र आणि राज्य सरकार व भाजपच्या घरगड्यांसारख्या वापर होत आहे. खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामिनातून त्रास कसा दिला जातोय आणि सत्तेचा गैरवापर कसा होतोय, हे देशाने पाहिले आहे. याशिवाय पाठीवर पडलेली थाप कधी निघेल याचा अनुभव आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच येईल.

शिवसेनेला न्याय मिळेल

निवडणूक आयोग ‘बायस’ पद्धतीने वागत असल्याची भावना जनतेची झाली आहे. त्यामुळे पक्षाविषयीची सुनावणी न्यायालयात झाल्यास निश्‍चित न्याय मिळेल. मुळातच, १६ अपात्र आमदारांचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला. त्याबद्दल अगोदर होकारार्थी अथवा नकारार्थी निर्णय घ्यावा आणि मग पक्षाचा निर्णय घ्यायला हवा. शिवसेना कधीही अडचणीत येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेला जनतेचे आणि राज्याचे बळ खंबीरपणे मिळत आहे. आगामी काळात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर माजी आमदार अशी पाटी लागणार असल्याने त्यांनी चिंता करू नये, असेही श्री. दानवे यांनी सांगितले.

सगळ्यांचा स्तर घसरतोय

ज्यांच्याकडून स्तर घसरू नये, अशी जबाबदारी असलेल्यांकडून स्तर घसरतोय, अशी टीका श्री. दानवे यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. श्री. दानवे म्हणाले, की मदतीला भीक म्हणणे चुकीचे आहे. शिवाय शाई फेकणे हे चुकीचे आहे. पण तरीही असा प्रकार कशामुळे झाला, याचा विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणात घडलेल्या घटनांची दखल माध्यमांनी घ्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT