Central Government : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; राज्यसभेत भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

MP Sanjay Singh : अशा गुंडगिरीने देश चालवायचा असेल तर सर्व विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाका...
Narendra Modi, Amit Shah, Latest News
Narendra Modi, Amit Shah, Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षनेत्यांवर सूडबुध्दीने कारवाई केली जात असल्याच्या मुद्यावरून राज्यसभेत आज सत्तारूढ भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी सोमवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आयकर विभाग व ईडीच्या छाप्यांचा मुद्दा उपस्थित करताना मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

अशा गुंडगिरीने देश चालवायचा असेल तर सर्व विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाका या संजय सिंह यांच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे द्यावेत असे निर्देश राज्य सभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिले.

संजय सिंह यांनी सरकारनेच दिलेल्या एका उत्तराच्या आधारे सरकारच्या सूडबुध्दीबाबत वक्तव्य केले. सरकारी तपास संस्था जाणूनबुजून विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप करताना संजय सिंह म्हणाले की, गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर झाला आहे.

ईडीचा वापर करून गेल्या ८ वर्षांत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ३००० छापे टाकण्यात आले आणि केवळ २३ लोकांना ईडीने दोषी ठरवले. म्हणजे केवळ ०.५ टक्के. याच सभागृहात प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनेच ही आकडेवारी दिली आहे. यावर सभागृहनेते पियूष गोयल यांच्यासह भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतले.

Narendra Modi, Amit Shah, Latest News
Nawab Malik : अनिल देशमुखांपाठोपाठ मलिकांना मिळणार का जामीन? आज होणार फैसला

सिंह म्हणाले की, हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरोधात ही ईडी गप्प का आहे ? विजय मल्ल्या, नितीन संदेसरा, ललित मोदी, रेड्डी ब्रदर्स, येडियुरप्पा यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. व्यापम घोटाळ्यावर कोणतीही कारवाई करत नाही. ‘तुमच्याशी‘ संबंधित असलेल्या सर्व भ्रष्टाचारांवर कारवाई करत नाही. येडियुरप्पा यांचे नाव येताच भाजप सदस्य पुन्हा खवळले.

केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत संजय सिंह म्हणाले की माझ्या मागच्या बाकावर बसलेले संजय राऊत १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आले आहेत. तुम्ही मनीष सिसोदिया यांच्या घरावर १४ तास छापे टाकले. सत्येंद्र जैन यांना तुरुंगात डांबले, अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापे टाकले. तुम्ही सर्वच विरोधी नेत्यांना तुरूंगात टाका.

Narendra Modi, Amit Shah, Latest News
'' माजी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर...''; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना टोला

मोदींचे भाषण 'सत्यापित' कसे करणार ?

संजय सिंह यांच्या आरोपांवर राज्यसभा अध्यक्ष धनखड यांनी, तुम्ही केलेले आरोप सिद्ध करा व ती कागदपत्रे उद्यापर्यंत सभापटलावर ठेवा, असा आदेश दिला.

मात्र, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) संजय सिंह यांच्या आरोपांचे समर्थन करताना म्हणाले की, संसदेच्या विविध उत्तरांमध्ये आणि बातम्यांमध्ये तथ्ये नमूद करण्यात आली आहेत. सदस्यांना पंतप्रधानांप्रमाणे पुरावे देण्याची सक्ती करू नये असे ते म्हणाले. दोन कोटी नोकऱ्या दिल्याचे पंतप्रधान म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रूपये टाकण्याचेही आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिले होते. त्यांना कोणी पुरावा मागितला ? त्यांचे म्हणणे आम्ही येथे मांडले तर पंतप्रधानांचेही म्हणणे सत्यापित करा, असे म्हटल्यासारखे होईल.

मात्र, धनखड यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. या आरोपांचे पुरावे देण्यासाठी राज्यसभाध्यक्षांनी संजय सिंह यांना मंगळवारपर्यंत (ता.१३) वेळ दिली व या मुद्यावर उद्याच सर्व पक्षनेत्यांची बैठक घेण्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com