Piyush Goel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Piyush Goyal Politics: केंद्रीय वाणिज्य मंत्री उद्या नाशिकमध्ये, कांदा उत्पादकांचा आवाज ऐकणार का?

Piyush Goyal; will Goyal withdraw onion export ban after demand of BJP-उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांसह भाजपच्या काही मंत्र्यांची कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी पियुष गोयल मान्य करणार का?

Sampat Devgire

Farmers politics News: नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच कांद्याचे दर गडगडले आहेत. गेल्या महिन्याभरात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कांद्याचे दर पुन्हा एकदा गडगडल्याने राजकीय नेत्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा आणि निर्यात शुल्काचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सध्या कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क आहे. हे तातडीने मागे घ्यावे यासाठी शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी आग्रही आहेत.

या संदर्भात नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून कांदा निर्यात बंदी उठविण्याचे मागणी केली होती. माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही याच विषयावर पत्र लिहिले. खासदार भास्कर भगरे तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांनीही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे ही मागणी केली होती.

दुसरीकडे जिल्ह्यात या प्रश्नावर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी याबाबत थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकला येत आहेत. एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देखील या कार्यक्रमात असतील. याच पार्श्वभूमीवर गेले काही दिवस लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिल्याचा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पियुष गोयल काय निर्णय घेतात, काय विधान करतात आणि शेतकऱ्यांसाठी काय भूमिका सांगतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा कांदा उत्पादकांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील सरकारला लक्ष्य केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील महायुतीचे सरकार दोन्हीही कोंडीत सापडले आहे.

गेल्या महिन्याभरात शेतकऱ्यांचे जवळपास साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे दर सातत्याने कोसळत आहेत. यातून पियुष गोयल शेतकऱ्यांना दिल्याचा देणार का याची चर्चा आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होऊ शकतो. त्यामुळेच पोलीस यंत्रणा आणि प्रशासन देखील सावध झाले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT