Girish Mahajan politics: नाशिकचे पालकमंत्री कोण? यावरून सुरू झाली रस्सीखेच

Girish Mahajan; Nashik Guardian Minister Girish Mahajan or Manikrao Kokate?-मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांची नियुक्ती रोखल्याची चर्चा
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तांचा प्रश्न पुढे आला आहे. यावर सत्ताधारी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये ओढाताण असल्याचे पुढे आले आहे. त्यातूनच नाशिक महापालिकेच्या आयुक्तांच्या नियुक्तीचा वाद पुढे आला आहे.

नाशिक मध्ये आगामी कालावधीत सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. हा कुंभमेळा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय असतो. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि अन्य कामांवर तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाबरोबरच नाशिकच्या पालकमंत्र्यांची प्रतिमाही चमकण्याची संधी असते.

Girish Mahajan
Congress Politics: आक्रमक काँग्रेस म्हणते, गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करा...

यापूर्वी गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री होते. त्यावेळी ते नाशिकचे पालकमंत्री देखील होते. हा अनुभव विचारात घेता यंदा पुन्हा गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होण्यास विशेष उत्सुक आहेत. त्यांची ही इच्छा लपून देखील राहिलेली नाही.

Girish Mahajan
Santosh Deshmukh Murder: वाल्मीक कराडच्या `त्या` बॅनरने नाशिकमध्ये कार्यकर्ते झाले आक्रमक!

नुकतीच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या काही तासातच त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. श्री कर्डिले हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली.

या स्थगितीमध्ये मंत्री महाजन यांची भूमिका महत्त्वाची होती, असे बोलले जाते. विशेष करून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मंत्री महाजन यांच्या पसंतीला महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. आयुक्त कर्डिले यांची नियुक्ती रखडण्यास ते एक कारण ठरले आहे. आता या पदासाठी मनीषा खत्री यांचे नाव पुढे येत आहे.

नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र यातील कोणालाही मंत्री होण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक सात आमदार आहेत. या पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे नाशिकमधून दोघेही मंत्री झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पालकमंत्री पदासाठी आग्रही राहण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांनी तसेच संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन की माणिकराव कोकाटे हा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने चर्चेचा विषय आहे.

मावळत्या सरकारमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने त्यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी विशेष भूमिका बजावली होती. यंदा मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. महायुतीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना मोठे महत्त्व दिले जाते, असे चित्र नाही. त्यामुळेच नाशिकचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून महाजन यांचे नाव चर्चेत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com