Shirdi News : माझं आजोळ नगर जिल्हा असल्यामुळे मला चांगलं आठवतंय. गेल्या ५३ वर्षांत कितीतरी वेळा निळवंडे धरणाच्या कामाचा नारळ फोडण्याचे काम अनेक राज्यकर्त्यांनी केले. निवडणुका आल्या की नारळ फोडायचा आणि सांगायचं आता आम्ही निळवंडे धरणाचे काम करणार,पण बघता बघता तीन पिढ्या गेल्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडले. (PM Narendra Modi to Visit Maharashtra's Shirdi : Nilavande dam took 53 years to complete: Ajit Pawar)
नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि इतर विकासकामांचे उद॒घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी निळवंडे धरणाच्या कामाच्या विलंबाबत काँग्रेस सरकारला जबाबदार धरले. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व इतर उपस्थित होते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या भेटीतून लोककल्याणची ऊर्जा मिळो, अशी प्रार्थना मी करतो. साईबाबांनी सबका मालिक एक असा मंत्र दिला. याचा अर्थ असा की सर्व जगाचे कल्याण करणार ईश्वर एकच आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा करून त्यांच्या प्रशासनचा मंत्र त्या घोषणेमार्फत लोकांपुढे ठेवला होता. त्या घोषणेची प्रेरणा साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्राचीच असावी. गेली साडेनऊ ते दहा वर्षे त्यांची कारकीर्द पाहिली, तर ते या घोषणेच्या मार्गानेच ते देशाला पुढे नेत असल्याचे आपल्याला सर्वांना पावलोपावली जाणवतं, असेही अजित पवार यांनी सांगितले.
निळवंडे धरणाबाबत पवार यांनी सांगितले की, निळवंडे हे साडेआठ टीएमसीचे धरण असून, पावणदोन लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाणी काटकसरीने वापरले, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तरच सर्वांना पाणी मिळणार आहे. जवळपास १८२ गावांना या धरणाचे पाणी मिळणार आहे. अनेक चढउतार आपण बघितले. दुसरा कॅनॉलही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हे धरण पूर्णत्वास नेण्याचे आणि त्याचे उद्घाटन करण्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायचं होतं. त्यामुळे मधला एवढा काळ गेला असावा.
रेल्वेची सुविधा, पाणी, भक्तांसाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवर चालला आहे. एक रुपयांत पीकविमा यांसारखे अनेक निर्णय घेतले आहे. प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करत आहे, असे वाटलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.