Sangli NCP News : जयंत पाटलांच्या सांगली राष्ट्रवादीतही लवकरच फेरबदल

NCP Sharad Pawar Group : येत्या पंधरा दिवसांत सर्व पदाधिकारी बदलले जाणार आहेत. त्यात तरुणांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
NCP
NCPSarkarnama

Sangli Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत तरुणांची फळी उभारण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतरच राज्यात नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी येत्या पंधरा दिवसांत बदलले जाणार आहेत. त्यात तरुणांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. (There will be reshuffle in Sangli NCP Congress)

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार पक्षांतर्गत निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP
Satara News : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन; उद्या सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. गावपातळीवरील प्रतिनिधींकडून तालुका स्तरावरील प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. जिल्हा स्तरावर सहा व राज्य स्तरावर तीन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

तालुका प्रतिनिधी निवडल्यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड होईल. त्यासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर काम करू इच्छिणाऱ्यांनी जिल्हा कार्यालयाकडे त्यांची नावे द्यावीत. तालुका स्तरावर बैठका घेताना संबंधितांच्या नावांचा विचार केला जाणार आहे.

NCP
Rajasthan Politics : 'मी दावेदारी का सोडू?' गेहलोतांचं मोठं विधान, पायलटांच्या भूमिकेकडे लक्ष...

निवडीचा कार्यक्रम येत्या आठवडाभरात जाहीर होणार आहे. पंधरा दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर होईल. जिल्हा कार्यकारिणी निवडल्यानंतर महिला, युवा व अन्य सेलच्या निवडी केल्या जातील. तालुका स्तरावरही ही पद्धती अवलंबली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

सांगलीची जिल्हा कार्यकारिणी निवडून तीन-चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता पुन्हा नियमानुसार तीन वर्षांनी बदल होत आहे. या वेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक व सचिव बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.

NCP
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com