Sunil Kedar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: धक्कादायक; भाजपचा स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांवर भरोसा नाय काय?... शहराध्यक्ष सुनील केदार म्हणतात, ती नावे कळवा!

Police action against BJP criminals, BJP office bearers upset by police action, Report names of BJP criminal workers-एकापाठोपाठ भाजपच्या राजकीय नेत्यांवर पोलिसांची कारवाई होऊ लागल्याने नाशिकचे भाजपचे नेते अस्वस्थ

Sampat Devgire

BJP News: नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अनेक वादग्रस्त राजकीय नेत्यांना पोलिस कारवाईतून अटक झाली. त्यामुळे शहरातील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी राजकीय गुन्हेगारांविरोधात मोहिमी उघडली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करून कारवाईची मोकळीक पोलिसांनी दिली आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात यावी यासाठी पोलिस कठोर पावले उचलत आहेत. त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे, बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या पाठोपाठ भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या दोन पुतण्यांना अटक झाली. आता भाजपचे मुकेश शहाणे हे चौथे नगरसेवक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्या खालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांचा क्रम लागतो.

राजकीय गुन्हेगारीने डोके वर काढल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले. गुन्हेगारांनी पोलिसांनाही आव्हान दिले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईची मोकळीक दिली आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

पोलिसांनी शहरातील विविध १४ मोठ्या नेत्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई केल्याने नागरिकांनी पोलिसांचे स्वागत केले. या संधीचे सोने करण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही कंठ फुटला आहे. कालपर्यंत मुग गिळून गप्प असलेले राजकीय पक्षांचे पदाधिकारी पुढे येऊन बोलू लागले आहेत.

यासंदर्भात सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांवरही कारवाई झाली आहे. त्यात दोन माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. या नगरसेवकांची पार्श्वभूमी वादग्रस्त आणि गुन्हेगारीशी संबंधित असतानाही त्यांचे पक्षात जोरदार स्वागत झाले. आता कारवाई झाल्यावर या पक्षाच्या अध्यक्षांनी पोलिसांचे कौतूक केले.

विशेष म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनाही याचा अनुभव आला आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याची तक्रार आल्याने ते सावध झाले. त्यांनी त्यावर थेट फर्मानच काढले. भाजपचे कोणी पदाधिकारी ओळखपत्राचा गैरवापर करून नियमबाह्य कामकाज करीत असल्यास त्यांची नावे कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. शहराध्यक्षांचे हे आवाहन मात्र चर्चेचा विषय ठरले.

अध्यक्षांच्या आवाहनाने काही पदाधिकारी मात्र दुखावले आहेत. त्यांनी या निमित्ताने शहराध्यक्षांना भाजपच्याच पदाधिकाऱ्यांवरच भरोसा नाय काय? असा प्रश्न केला आहे. सामान्यत: नियमबाह्य कामाच्या तक्रारी पोलीसांकडे कराव्या लागतात. भाजपने आता पोलिसांचा देखील स्वतंत्र कक्ष सुरू केला की काय? अशी चर्चा या कार्यकर्त्यांत जोर धरू लागली आहे.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT