Nashik News, 12 Oct : नाशिक शहरातील गुन्हेगारी शिगेला पोहोचल्याने सत्ताधारी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय आशीर्वाद असलेल्या गुन्हेगारांविरूद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मोठ्या गुन्हेगारांना टार्गेट केले जात आहे.
गेले काही दिवस केंद्रीय राज्यमंत्र्याचा निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे चर्चेत आहेत. खंडणीसाठी गोळीबार केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचा मुलगा दीपक लोंढे अटकेत तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरारी आहे.
पोलिसांनी शनिवारी प्रकाश लोंढे यांच्या संपर्क कार्यालयाची झडती घेतली. या अनधिकृत कार्यालयाच्या तपासणीत धक्कादायक प्रकार घडकीस आला. या कार्यालयात चक्क जमिनीखाली खोली आढळली आहे. संबंधित कार्यालय अनधिकृत आहे.
गेली अनेक वर्ष माजी नगरसेवक लोंढे त्याचा जनसंपर्क कार्यालय म्हणून वापर करीत आहे. 2015 मध्ये देखील सामाजिक कार्यकर्त्याच्या याचिकेवरून हे कार्यालय पाडण्याची कारवाई झाली होती. यापूर्वी अनाधिकृत म्हणून महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हे कार्यालय पाडले होते. तेव्हाही त्यात भुयार आढळले होते. त्याचा गुन्हेगारीसाठी वापर केला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.
त्याच जागेवर राजकीय आशीर्वादाने लोंढे यांनी पुन्हा भव्य कार्यालय उभारले होते. महापालिका आणि सत्ताधारी पक्ष पाठीशी होते. त्यामुळे या कार्यालयाकडे सर्व यंत्रणांनी डोळे झाक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी कार्यालय सील केले आहे. महापालिका अतिक्रमण विभागाची संपर्क करून पुढील कारवाई होणार असल्याचे कळते.
गेल्या आठवड्यात शहरातील बियर बार आणि रेस्टॉरंट यांच्याकडून खंडणी सुरू व्हावी यासाठी बियर बार मालकावर 'आरपीआय'चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांचे चिरंजीव भूषण लोंढे यांनी गोळीबार केला होता. संबंधिताला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर इंदिरानगर भागातील बंगला लोंढे यांच्या टोळीतील सदस्यांनी बळकावला होता. या प्रकरणात दोन कोटी रुपये खंडणी मागण्यात आली होती. माजी नगरसेवक लोंढे यांच्या गुन्हेगारी कारवायांनी पोलीस यंत्र नाही चक्रावून गेली आहे. टोळी चालविणारा भूषण लोंढे सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे. मात्र कार्यालयात दुसऱ्यांदा भुयार आढळल्याने पोलीस यंत्रणेलाही धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.