Mumbai Naka
Mumbai Naka Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Action on Vasant Gite Office : वसंत गीतेंचे कार्यालय पाडण्यासाठी मोठा फौजफाटा दाखल; मुंबईनाका परिसरात तणाव!

Sampat Devgire

Nashik Political News: ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यालय पाडण्यासाठी शनिवारी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. भारतीय जनता पक्षाच्या राजकीय दबावातून ही कारवाई होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे. असा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात काही दिवसांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावली होती. येथे कोणत्याही पक्के बांधकाम नाही केवळ एक पत्र्याची शेड आहे. ती राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत असल्याची माहिती समोर आली आहे.

तर या कारवाई संदर्भात माजी आमदार वसंत गीते(Vasant Gite) यांच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे वकील बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेत आहेत. न्यायालयात अद्याप सुनावणी झाली नसताना आज ही कारवाई झाल्याने वाद उफण्याची चिन्हं आहेत.

एवढंच नाहीतर या कारवाईसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून सत्ताधारी आमदारांनी दबाव आणल्यामुळेच पोलिसांनी घाईघाईत ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला, असल्याची चर्चा आहे. तर या कारवाईप्रसंगी माजी आमदार गीते यांच्या समर्थकांनी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबतही माहिती दिली.

येत्या 3 जुलैला पुढील सुनावणी असल्याने हे शेड पाडू नये, अशी विनंती त्यांनी केली. यावरून बराच वादविवाद सुरू आहे. त्यामुळे अतिक्रमण काढणार की नाही याची उत्सुकता आहे. मुंबई नाका येथे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे(Devyani Pharande) आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांचे भद्रकाली मतदान केंद्रावर वाद झाले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या कारवाईला जोडले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT