Shivsena UBT Politics : लोकसभेपाठोपाठ विधानसभाही जिंकण्यासाठी शिवसेनेच्या रणरागिणी मैदानात; रश्मी ठाकरेंसह खलबतं

Nashik Political News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यातील महिलांची मुंबईत विधानसभा निवडणुक तयारीची बैठक
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama

Shivsena UBT News: आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला राज्यात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि सध्या सुरू असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेच्या महिला उपनेत्यांची बैठक शिवसेना (Shivsena) भवन मुंबई येथे झाली. या निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्याचे ठरले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिला नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढावा. नागरिकांमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे सरकार स्थापन करण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सध्या सत्तेत असलेले सरकार महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प, संस्था, शासकीय कार्यालये काहीही सुरक्षित ठेवू शकत नाही. महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून राज्याचे मुख्यमंत्री बसतात. हे मराठी माणसाला अतिशय खेद वाटावं अशी स्थिती सध्या राज्यात आहे, असे महिला नेत्यांनी वेळी सांगितले.

Shivsena UBT News
Uddhav Thackeray News : मोठी बातमी! विधानपरिषदेतून रिटायर्ड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच 'हे' आमदार पित्यासह ठाकरेंच्या भेटीला, शिंदेंना धक्का?

महाराष्ट्रातील जनतेला आता फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनच अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष निश्चितच सत्तेत येईल. महाराष्ट्रातील जनतेचा हा कल लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला नेत्यांनी सबंध राज्य पिंजून काढावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी उत्तर महाराष्ट्रातील राजकीय आढावा उपनेते शुभांगी पाटील यांनी सादर केला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, रंजना नेवाळकर, ज्योती ठाकरे, संजना धाडी ,अस्मिता गायकवाड, छाया शिंदे, जान्हवी सावंत, शितल देवरुखकर आदी उपनेते सहभागी झाल्या. रश्मी ठाकरे या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.

Shivsena UBT News
Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com