IAS Pooja Khedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार; सुनावणीसही गैरहजर!

Controversial IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरच्या मागे कायद्याचा सेमीमीरा लागला आहे.

Sampat Devgire

latest news on Pooja Khedkar: वादग्रस्त आणि बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढत आहेत. सध्या त्यांच्या क्रिमिलियर सर्टिफिकेटची सध्या तपासणी सुरू आहे. महसूल यंत्रणेकडून त्याबाबत गेले तीन महिने सखोल माहिती संकलित करण्यात आली होती. या संदर्भात प्रमाणपत्र रद्द का करू नये, याविषयीची सुनावणी आज(२५ एप्रिल) झाली.

विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयात ही सुनावणी झाली. यामध्ये उपायुक्तांनी ही सुनावणी केली यावेळी पूजा खेडकर(Pooja Khedkar) यांची अनुपस्थित होती त्यांच्यावतीने वकिलाने काही कागदपत्र सादर केली.

तर पूजा खेडकरच्या क्रिमिलियर सर्टिफिकेटबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. यामध्ये खेडकर कुटुंबीयांची संबंधित 12 मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे क्रिमिलियरच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत महसूल विभाग पूजा खेडकरचे क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द करण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरला राज्य शासनाने यापूर्वीच बडतर्फ केले आहे. त्यांच्याविरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तक्रार आहे. त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला देखील प्रलंबित आहे. पूजा खेडकर सध्या हंगामी जामीनावर बाहेर आहेत.

एकंदरच पूजा खेडकर यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे. त्यामुळे सातत्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या स्थितीत पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे चित्र आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT