Anikat Tatkare
Anikat Tatkare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aniket Tatkare News; लोकवस्ती 40 हजार, घरे मिळाली दोन!

Sampat Devgire

मुंबई : पंतप्रधान (Centre Government) म्हणतात 2022 पर्यंत सर्वांना घरे देऊ, मात्र प्रशासनाची कार्यपद्धती पाहिली तर ते शक्य होणार आहे का? याबाबत प्रशासनाची (Administration) कार्यपद्धती अतिशय अडचणीची आहे. माझ्या मतदारसंघातील पेण (Pen) शहराची लोकसंख्या चाळीस हजार आहे. मात्र तीथे दोन घरे मंजूर झाली आहेत, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी व्यक्त केली. (Sheltre for every citizen scheme had many obstacles in implimentation)

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत श्री. तटकरे यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा उल्लेख करीत, प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल का? असा प्रश्न उपस्थित करीत अभिभाषणावर टिका केली. नीलम गोऱ्हे सभापती होत्या.

आमदार तटकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंग यांच्या समवेत आग्र्याच्या किल्ल्यात गेले होते. तेव्हा औरंगजेब बादशहांपुढे प्रत्येकाला वाकून जावे लागायचे. मात्र छत्रपतींनी उजवा पाय पुढे टाकत न झुकता आपला मराठी बाणा दाखवून दिला. राज्यापालांच्या अभिभाषणात हा बाणा कुठे आहे?.

अभिभाषणात 61 हजार रोजगार निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. मात्र हे रोजगार कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला. रोजगार, उद्योग परराज्यात गेलेत. रायगड जिल्ह्यातील आरसीएफ प्रकल्पात नऊ हजार कोटींची गुंतवणूकीचा प्रस्ताव आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, मात्र सरकारमधील काही मंडळींचाच त्याला विरोध आहे. हा विरोध का? असा प्रश्न तटकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील दोन हजार सहाशे किलोमीटरचे रस्ते मंजुर आहेत. मात्र गेली दोन वर्षे केंद्राकडून त्याला मंजुरी मिळत नाही. तीन-तीन वर्षे प्रस्ताव पडून आहेत. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर आता काही प्रक्रीया सुरु झाली आहे.

आवास योजनेची अंमलबजावणी देखील अशीच असल्याचे तटकरे म्हणाले. अतिशय त्रासदायक निकष आहेत. प्रशासनाची स्थिती अडचणीची आहे. पेण शहराची लोकसंख्या चाळीस हजार आहे, मात्र तेथे दोन घरे मंजुर आहेत. अशा तऱ्हेने काम होत असेल तर सर्वांना घरे हे कसे साध्य होईल.

या सर्व अभिभाषणात तुम्ही कोकणाला काय दिलं. मुंबई-गोवा महामार्ग चौदा वर्षे वनवासात आहे. नागरिक जेव्हा जेव्हा कोकणात जाता तेव्हा ते लोकप्रतिनिधींच्या नावाने शिमगा करतात. भुमीगत तारा, पाणी योजना, सगळीकडे संथ गती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT