Ahilyanagar District Bank Election Result : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून जातच ती बिनविरोध करून, आमदारकी मिळवणारे प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे कट्टरे कार्यकर्ते देवळाली प्रवरानगरचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी आव्हान दिले होते.
निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सत्यजीत कदम यांनी दिलेल्या आव्हानाची प्राजक्त तनपुरे यांनी हवाच काढून घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार तनपुरे यांना 89, तर सत्यजीत कदम यांनी अवघी 18 मते मिळाली. आमदार तनपुरे यांनी तब्बल 71 मतांनी विजय मिळवला. एकंदर सेवा सोसायटीच्या राहुरी मतदारसंघात तनपुरे-कदम यांची लढाई म्हणजे, भाजपविरुद्ध भाजप अशी झाली.
राहुरी सोसायटी मतदारसंघात 107 मतदार होते. त्यातील आमदार तनपुरे (Prajakt Tanpure) यांना 89, तर सत्यजीत कदम यांनी अवघी 18 मते मिळाली. आमदार तनपुरे यांनी खूप मोठ्या फरकाने विजय मिळवला. बँकेचे माजी संचालक अरुण तनपुरे यांचे पुत्र हर्ष तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु हर्ष तनपुरे यांच्या गळ्यात राहुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाची माळ पडली. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंचा बँकेचा मार्ग अधिक सुकर झाला.
प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात भाजपचे (BJP) देवळाली प्रवरेचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम चांगले आव्हान निर्माण करतील, असे वाटत असतानाच, मतदानाचौ कौल समोर येता, तनपुरेंची सहकारातील ताकद देखील समोर आली. सत्यजीत कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आहेत. राहुरी मतदारसंघातून कदम परिवाराला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी आकांक्षा बाळगून आहेत. त्यासाठी भाजप अंतर्गत त्यांना संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीला दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमोर सत्यजीत कदम यांनी आव्हान उभे केले होते. वरिष्ठांनी मनधरणी केल्यानंतर सत्यजीत कदम यांनी माघार घेतली. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर कदम यांनी पुन्हा मुंबईपर्यंत आमदरकीसाठी फिल्डिंग लावली. याच दरम्यान, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा अजेंडा घेत, वातावरण निर्मिती केली.
प्राजक्त तनपुरे आणि सत्यजीत कदम यांच्या पोटनिवडणुकीच्या तिकिटासाठी रस्सीखेंच सुरू असतानाच, अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळाली. पुढे विधान परिषदेसाठी सत्यजीत कदम यांनी जोरदार लाॅबिंग केले होते. पण तिथे प्राजक्त तनपुरेंनी मागून येऊन पुढे गेले. सत्यजीत कदम पुन्हा मागे राहिले. आता जिल्हा बँकेत तडजोड नाही, असे म्हणत, सत्यजीत कदम यांनी चांगला शड्डू ठोकला होता.
सत्यजीत कदम यांनी राहुरी सेवा सोसायटी मतदारसंघात वातावरण निर्मितीचा प्रयत्न देखील केला होता. परंतु प्राजक्त तनपुरे आणि तनपुरे परिवाराची सहकारावर असलेली पकड आणि मंत्री विखे पाटील यांनी तनपुरेंना दिलेल्या ताकदीसमोर कदम कमी पडले. निकालाचे चित्र समोर येताच ते देखील स्पष्ट झाले. सत्यजीत कदम यांना अवघे 18 मते मिळाली आहे. तुलनेत प्राजक्त तनपुरे हे 89 मते घेऊन विजयात खूप पुढे निघून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.