Lalita Shinde & Prajakta Mali Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पुन्हा वादात, यावेळी नाशिक वादाचे केंद्र!

Prajakta Mali; Prajakta Mali controversy, dance at Trimbakeshwar Temple Mahashivratri-प्राजक्ता माळी महाशिवरात्रीला त्रंबकेश्वर येथे नृत्य करणार असल्याने नवा वाद

Sampat Devgire

Prajakta Mali dispute: बीड प्रकरणाने वादात सापडलेल्या प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे त्या नृत्य करणार आहेत. त्यांचा हा कार्यक्रम वादाचा विषय ठरला आहे.

येत्या 26 फेब्रुवारीला होणाऱ्या महाशिवरात्रीची जोरदार तयारी येथे सुरू आहे. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याला भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. दरवर्षी या मंदिरात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

यासंदर्भात त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त संस्थेकडून दोन दिवसांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान चांगलेच वादात सापडले आहे. यावरून विश्वस्तांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

या संदर्भात विश्वस्त सचिव श्रेया देवचक्के यांनी विश्वस्त मंडळाने हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतःच तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे हा कार्यक्रम घेतला जाणार आहे, असे सांगितले.

त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थेच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी मात्र या उपक्रमाला तीव्र आक्षेप नोंदविला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे केंद्रीय पुरातत्व संस्थेच्या अधिपत्याखाली आहे. या संस्थेच्या नियमावलीनुसार अशा कार्यक्रमांना परवानगी नसते. मात्र त्याकडे विश्वस्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असे त्या म्हणाले. ------

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इतिहासात कधीही असे सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रींना घेऊन कार्यक्रम झालेले नाहीत. मंदिरात फक्त धार्मिक कार्यक्रम केले जातात. या कालावधीत मोठी गर्दी होणार आहे. भाविकांच्या या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. असे असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न श्रीमती शिंदे यांनी केला आहे.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची देखील आपण चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. एकंदरच बीड प्रकरणावरून प्राजक्ता माळी चर्चेत आल्या होत्या. त्यावरून समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. आता त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात नृत्य करण्याच्या त्यांच्या घोषणेने नवा वाद उभा राहिला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT