
Nashik News : न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. इथे त्यांना दिसाला मिळण्याची शक्यता असतानाच या याचिकेविरोधात दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या मुलीनेही उडी घेतली आहे.
अंजली दिघोळे राठोडही याचिका दाखल करणार आहेत. कोकाटे यांच्या अपिलाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा निर्णय अंजली यांनी घेतला असल्याची माहिती आहे. कोकाटे यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर हा जुना राजकीय वाद असल्याचे आणि त्यातून दिघोळे यांनी याचिका दाखल केल्याचे सांगितले होते. पण अंजली दिघोळे यांच्या या प्रकरणातील एन्ट्रीने या वादात नवा ट्विस्ट आला आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विरुद्ध दिवंगत मंत्री तुकाराम दिघोळे हा नाशिकमधील तीन दशकांपासूनचा जुना वाद होय. प्रत्येक निवडणुकीत हा वाद पाहायला मिळायचा. स्थानिक राजकारणात सुरूवातीला दिघोळे वरचढ ठरले. कालांतराने कोकाटे यांनी त्यांचे वर्चस्व तयार केले.
2019 मध्ये दिघोळे (Tukaram Dighole) यांचे निधन झाले. त्यावेळी या वादाला पूर्णविराम मिळेल असे वाटत होते. पण कोकाटे यांच्यावर सदनिका खरेदी करताना बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप असलेली एक याचिका दिघोळे मागे सोडून गेले होते. नुकताच या याचिकेवर निकाल लागला आणि यात कोकाटे दोषी सापडले. त्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखाद्या फौजदारी खटल्यात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यास संबंधित लोक प्रतिनिधीचे विधिमंडळ किंवा संसदेचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार आता कोकाटे यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचीही आमदारकी रद्द होऊ शकते. सध्या या प्रकरणात कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच सत्र न्यायालयातही त्यांनी धाव घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.