Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'लाडकी बहीण' योजनेसाठी आदिवासींचे बजेट वापरले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर सवाल

Prakash Ambedkar Eknatha shinde mazi ladki bahin yojana : आदिवासींचे बजेट आदिवासांवर खर्च करण्याचे संविधानाचे बंधन आहे. आदिवासी बजेटमध्ये कशाकशावर खर्च केला याचे विवरणपत्र काढावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे सरकारला केले.

Roshan More

Prakash Ambedkar News : विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजा गेमचेंजर ठरेल, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे. तर, राज्य सरकारकडे निधीच नसल्याचा आरोप विरोध करत आहेत. यामध्ये आदिवासींचे बजेट 'लाडक्या बहीण' योजनेसाठी वर्ग केले का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आदिवासींचे बजेट सात टक्के आहे. म्हणजे ते 70 कोटी होते. लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आला? आदिवासींच्या बजेटचे 7 हजार कोटी लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग केले का, असा सवाल आंबेडकर यांनी सरकारला विचारला आहे.

आदिवासींचे बजेट आदिवासांवर खर्च करण्याचे संविधानाचे बंधन आहे. आदिवासी बजेटमध्ये कशाकशावर खर्च केला याचे विवरणपत्र काढावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे सरकारला केले. दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणिव नाही, असा आरोप देखील आंबेडकर यांनी केला.

बोगस आदिवासी भरती

विधानसभेत बोगस आदिवासी भरती झाल्याचे सांगण्यात आले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण पात्र आदिवासींची पेसा अंतर्गत भरती केली नाही. नाशिकचे आदिवासी आयुक्तलया समोर आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यलय आंदोलनाचे केंद्र करा, असे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले.

गावित यांनी तिसऱ्या आघाडीत यावे

पेसा अंतर्गत भरतीसाठी माजी आमदार जे पी गावित आक्रमक झाले आहेत. जे पी गावीत यांनी आमच्या सोबत तिसऱ्या आघडीत यावे, अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांची गवितांना दिली आहे. माकपचे काँग्रेसशी लग्न झाले आहे. त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहू, असे देखील आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT