Bhushan Londe custody Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhushan Londe Arrest : आरपीआय नेते प्रकाश लोंढेंच्या मुलाचे दोन्ही पाय मोडले, नाशिक पोलिसांनी नेपाळ सीमेवर ठोकल्या बेड्या

Prakash Londe Son Arrest : आरपीआय आठवले गटाचे नाशिक जिल्ह्यातील नेते प्रकाश लोंढे यांचा मुलगा व सराईत गुन्हेगार भूषण लोंढे हा दोन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांची पथके त्यांच्या शोधात होती.

Ganesh Sonawane

Nashik Crime News: त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल परिसरातील हॉटेल ऑरामध्ये ५ ऑक्टोबरला गोळीबार झाला होता. या गोळीबारातील मुख्य संशयित भूषण लोंढे दोन महिन्यांपासून फरार होता. त्याला शोधण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश आलं. भूषण लोंढे आणि त्याचा सहकारी प्रिन्स सिंग यांना पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली.

भूषण लोंढे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाचे जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. गोळीबारानंतर तो फरार झाला होता. खंडणी व हॉटेल ऑरामध्ये झालेल्या गोळीबारात प्रकाश लोंढे व त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंढे यांना दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते कोठडीत आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या दुसऱ्या युनिटचे पथक गेल्या महिनाभरापासून भूषण लोंढे व प्रीन्स या दोघांच्या मागावर होते. दोघेही राजस्थान ते उत्तरप्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य बदलत असल्याने दोन वेळा त्यांनी पोलिसांना चकवा दिला होता. सातपूर पोलिसांत प्राणघातक हल्ला, खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

मागील महिन्यात हे दोघे उत्तरप्रदेशातील बडौत (जि. बागपत) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी पोलिस यूपीतील बडौतला गेले. त्यावेळी पोलिस आल्याचे कळताच दोघांनी उंचावरुन उडी घेऊन पळ काढळा. यात दोघे जखमी झाले, भूषण लोंढेचा तर पायच फ्रॅक्चर झाला.

त्यानंतर आरोपी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये ठिकाणे बदलत मित्रांकडे रहात होते. राजस्थानच्या कोटपुतलीत पोलिस पोहोचले, मात्र लोंढे फरार झाला होता. नेपाळ सीमेवरील महराजगंजमध्ये त्याने मित्राकडे मुक्काम अन् उपचार केले. प्लास्टरकाढल्यावर आपण नेपाळला पळून जाऊ अशी त्याने तयारी केली होती. मात्र पोलिसांनी फ्रॅंक्चर अवस्थेत लोंढेला ताब्यात घेतले.

नाशिक पोलिसांनी भूषण लोंढे व त्याचा साथीदार प्रीन्स दोघांच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना पकडण्यासाठी शिताफीने सापळा रचणे गरजेचे होते. दोघांनाही खूप प्लॅनिंग करुन नाशिक पोलिसांनी पकडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT