RPI Leader Bhushan Londhe News: सातपूर येथील बार मध्ये गोळीबार आणि मालकावर सशस्त्र हल्ला करण्याचे गंभीर प्रकरण घडले होते. 2025 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांसह त्यांचे चिरंजीव भूषण लोंढे आणि त्यांच्या टोळीतील अन्य सदस्यांवर गुन्हा दाखल होता.
गेले दोन वर्ष रिपब्लिकन नेते प्रकाश लोंढे जेलमध्ये होते. स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पोलिसांनी त्यांच्यासह टोळीतील अन्य संशयितांवर मोक्काची कारवाई केली होती.
माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याने ते चांगलेच अडचणीत आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने केल्या आठवड्यात त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर होताच लोंढे थेट राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीला गेले होते.
राज्यमंत्री आठवले यांनी प्रकाश लोंढे यांना जामीन मिळताच त्यांची पदावर फेरनियुक्ती केली होती. राज्यमंत्री आठवले यांनी यापूर्वी लोंढे यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त केली होती. पोलिसांनी त्यांना जामीन द्यावयास मदत केली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.
माजी नगरसेवक लोंढे यांना जामीन मिळाल्याने लोंढे कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या खटल्यातील संशयित आणि मुलगा भूषण लोंढे यानेही मुंबई उच्च न्यायालयात जा मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
पोलिसांनी भूषण लोंढे याला जामीन मिळू नये यासाठी पाठपुरावा केला. पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोंढे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. हा लोंढे यांच्यासाठी राजकीय सेटबॅक देखील मानला जातो.
भूषण लोंढे यांच्या विरोधात २००७ ते २०२५ या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. यातील अनेक गुन्हे खंडणी तसेच खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची संबंधित आहेत. त्याच्या विरोधात गुन्ह्यांची यादी मोठी असल्याने न्यायालयाने त्याची दखल घेतली.भूषण लोंढे याचा जामीन फेटाळल्याने आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांना हा मोठा धक्का आहे. आरपीआय पक्षालाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे लोंढे कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.