Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil CM Post News : विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरातांच्या ‘होमपिच’वर प्रार्थना!

Vijaykumar Dudhale

Nagar News : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आता आणखी एक नाव पुढे येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. मात्र, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी दर्ग्यात प्रार्थना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही प्रार्थना विखे पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधून ही प्रार्थना करण्यात आलेली आहे. (Prayer for Chief Ministership of Radhakrishna Vikhe Patil in Sangamner)

संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहमंद दर्ग्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रार्थना करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या पीर मोहमंद यांचा सध्या संगमनेर शहरात उरूस सुरू आहे. या उरुसाला भेट देण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील हे गुरुवारी (ता. १४ सप्टेंबर) संगमनेर येथे आले होते.

ख्वाजा पीर मोहमंद दर्ग्याला भेट देण्यासाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते येत असतात. त्याचप्रमाणे ऊरुस असल्यामुळे महसूल मंत्री विखे पाटील हे गुरुवारी रात्री दर्ग्यात आले होते. त्यांनी दर्ग्यात चादर चढविली. त्यानंतर दर्ग्यातील धर्मगुरुंनी राधाकृष्ण विखे पाटील हे २०२४ मध्ये मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.

काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या होमपिचवर विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रार्थना करण्यात आल्याने त्याची चर्चा रंगली आहे. वास्तविक थोरात आणि विखे पाटील हे दोघेही काँग्रेसमध्ये एकत्र असताना ते एकमेकांचे स्पर्धकच होते. त्यामुळे विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी संगमनेरमधून होणारी प्रार्थना विशेष ठरते.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स लागले होते. त्यावेळी त्याबाबतची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने मुख्यमंत्रिपदासाठी आणखी इच्छूक मैदानात आल्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT