Walse Patil Daughter In Politics : वळसे पाटलांच्या कन्येची आंबेगावातील कार्यक्रमांना हजेरी वाढली; पण राजकीय भूमिका ठरेना!

Ambegaon Assembly Election : त्यांनी आतापर्यंत कोणतेही राजकीय वक्तव्य केलेले नाही. तसेच, आपण राजकारणात येणार नसल्याचेही ठामपणे सांगितलेले नाही.
Dilip Walse Patil-Purva Walse Patil
Dilip Walse Patil-Purva Walse Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ambegaon News : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची एकुलती एक कन्या अ‍ॅड. पूर्वा वळसे पाटील यांचा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात वावर वाढला आहे. विधानसभेच्या २०२४ निवडणुकीत त्या अजित पवार गटाच्या उमेदवार तथा वळसे पाटील यांच्या उत्तराधिकारी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत कोणतेही राजकीय वक्तव्य केलेले नाही. तसेच, आपण राजकारणात येणार नसल्याचेही ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळे मतदारसंघात गोंधळाची परिस्थिती आहे. राष्ट्रवादी एकसंघ होती, तोपर्यंत वळसे पाटील यांची बाजू खंबीर होती. पण, सद्यस्थितीत पूर्वा वळसे यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. (Dilip Walse Patil's daughter's attendance at events in Ambegaon increased)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन महिन्यांपूर्वी दोन गट झाले आणि पक्षाच्या प्रत्येक नेत्याची आपापले मतदार संघ आपल्या बाजूला राहतील, यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात आपले राजकीय स्थान अबाधित ठेवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. अर्थात वळसे पाटील यांच्या तब्येतचा विचार करता ते विधानसभेच्या निवडणुकीत थांबतील, अशी चर्चा मतदार संघात आहे.

Dilip Walse Patil-Purva Walse Patil
MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या वकिलाने युक्तिवाद करताच शिंदे गटाने घेतला हा मोठा आक्षेप…

सहकार मंत्री वळसे पाटील हे आपली एकुलती एक मुलगी अ‍ॅड. पूर्वा यांना मतदार संघात लॉंच करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे स्वत: पूर्वा याही गेल्या काही दिवसांत मतदार संघातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मात्र, राजकारणात सक्रीय होणार की नाही याबाबत त्यांचा ठोस निर्णय झाल्याचे दिसत नाही. कारण, मतदार संघातील त्यांच्या जनसंपर्कात ना सातत्य आहे ना वळसे पाटील यांचा राजकीय वारसा आपणच पुढे चालवणार अशी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत, त्यामुळे मतदारसंघ सध्या द्विधा मनःस्थितीत आहे.

गेल्या दीड महिन्यात पूर्वा वळसे पाटील यांनी मतदार संघात रक्षाबंधन, जांबुत येथील अखंड हरिनाम सप्ताह, लाखणगाव येथील अपघाती मृत रसिक दौंड या युवकाच्या कुटुंबीयांना भेट आणि पुणे पोलिसांच्या सायबर सुरक्षा दिंडी या मोजक्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय इनिंगबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्या स्वत: काही राजकीय विधान करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात संभ्रमावस्था आहे.

Dilip Walse Patil-Purva Walse Patil
Solapur NCP President: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नेमले सोलापूरचे शिलेदार; साळुंखे, तांबोळींकडे सुत्रे

पुतण्या की मुलगी?

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले विवेक वळसे पाटील तसेच भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील हे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत. या दोघांचीही चर्चा अधूनमधून आंबेगाव मतदार संघातून विधानसभेसाठी होत असते. मात्र, थेटपणे या दोघांनी कधीही आमदारकीबाबत इच्छा बोलून दाखवलेली नाही. अ‍ॅड. पूर्वा वळसे पाटील यांची भूमिका जाहीर होत नाही, तोपर्यंत आंबेगाव विधानसभा मतदार संघात संभ्रमावस्था कायम राहणार आहे.

Dilip Walse Patil-Purva Walse Patil
Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांचा भरणेंवर निशाणा; ‘वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलिबॉल खेळताना पडलो, तर त्यात काय वाईट?’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com