Indapur Politics : हर्षवर्धन पाटलांचा भरणेंवर निशाणा; ‘वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलिबॉल खेळताना पडलो, तर त्यात काय वाईट?’

पाय घसरून पडलेले भाजप नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात सध्या वरातीत नाचणे आणि व्हॉलिबॉल खेळणे यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Dattatray Bharane-Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : इंदापूर तालुक्यात कोणत्या विषयाचे राजकारण होईल, याचा नेम नाही. पाय घसरून पडलेले भाजप नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात सध्या वरातीत नाचणे आणि व्हॉलिबॉल खेळणे यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ‘वरातीमध्ये नाचण्यापेक्षा व्हॉलिबॉल खेळताना पडलो, तर त्यात वाईट काय?’ असे म्हणून पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार भरणेंना नाव न घेता चिमटा काढला आहे. (Harshvardhan Patil's unnamed criticism of Dattatray Bharne)

हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय भरणे हे राज्यात सत्ताधारी पक्षात आहेत. मात्र, इंदापूरमध्ये या दोघांमधून विस्तवही जात नाही. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. इंदापूर तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा काही दिवसांपूर्वी पार पडली. त्याच स्पर्धेचे उद्‌घाटन व्हॉलिबॉल खेळून करताना हर्षवर्धन पाटील हे पाय घसरून पडले. त्यात त्यांच्या पायाची करंगळी मोडली. सध्या त्यांच्या पायाला प्लास्टर आहे.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या वकिलाने युक्तिवाद करताच शिंदे गटाने घेतला हा मोठा आक्षेप…

पाटलांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावरून सध्या टीका-टिपण्णी सुरु आहे. एका कार्यक्रमामध्ये चार-पाच दिवसांपूर्वी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील यांचा पाय मोडल्याच्या कारणावरुन टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी खास शैलीत उत्तर दिले आहे.

वरातीमध्ये नाचण्यापेक्षा व्हॉलिबॉल खेळताना पडलो, तर त्यात वाईट काय? असे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पाटील यांनी सांगून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या निशाणा साधला आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी अनेकदा विविध कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्यात सहभागी होऊन युवकांसोबत डान्स केलेला आहे.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
India Aghadi's Lok Sabha Strategy : इंडिया आघाडीचं ठरलं; जागावाटप राज्यपातळीवरच होणार, राष्ट्रीय नेते करणार शिक्कामोर्तब

हर्षवर्धन पाटील यांनी तोच धागा पकडून दत्तात्रेय भरणे यांना चिमटा काढला आहे. इंदापूर तालुक्यातील जनता या पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यानंतर ताठ मानेने, कॉलर टाईट करुन इंदापूर तालुक्याचे नाव सांगत होते. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यानंतर तालुक्यातील नागरिकांना दबक्या आवाजात इंदापूरचे नाव सांगावे लागत आहे. इंदापूरचे नाव ऐकून पुढचा माणूस काय म्हणेल, बोलेल याचा नेम नाही, अशी टीकाही त्यांनी केली हेाती.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Solapur NCP President: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नेमले सोलापूरचे शिलेदार; साळुंखे, तांबोळींकडे सुत्रे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com