Ajit Pawar group Nari Melava Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News : झिरवाळ यांनी धरला ठेका, अजितदादा मात्र नाचलेच नाहीत!

Sampat Devgire

NCP Ajit Pawar Group News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मुंबईत नारी निर्धार मेळावा घेतला. पक्षामध्ये महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले. (Presence of tribal women of Nashik in Ajit Pawar group's women's Melava was eye-catching)

मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या मेळाव्याला राज्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांची उपस्थिती होती. यामध्ये नाशिकच्या आदिवासी भागातील महिला पारंपारिक वेशभूषा आणि वाद्यांसह सहभागी झाल्याने लक्षवेधी ठरल्या. एकंदर या मेळाव्यावर नाशिकची छाप होती. पेठ, दिंडोरी, कळवण भागातील महिलांनी या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांना जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते आदिवासींची पारंपरिक पावरी धनुष्य आणि शेवंती भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी आदिवासींच्या पारंपारिक वाद्यांच्या मधुर संगीतावर उपस्थित महिलांनी चांगलाच ठेका धरला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही बराच वेळ ताल धरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या नृत्याचा आनंद घेत संयम राखला. त्यामुळे ते नाचतील अशी अपेक्षा असलेल्या महिला कार्यकर्त्यांची निराशा झाली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सध्या पक्षाच्या संघटनात्मक विस्तारावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा नारी निर्धार मेळावा झाला. उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी पक्ष संघटना आणि समाजामध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान असते. आपला पक्षही महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देऊन सर्व स्तरांमध्ये पक्षाचा विस्तार करेल, असे सांगितले.

अजित पवार गटाच्या निर्धार मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ, मंत्री अनिल पाटील, समीर भुजबळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT