Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मतदारसंघात मराठा आंदोलकांना नोटीस; नेमकं काय घडलं...

Manoj Jarange March to Mumbai: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात येवल्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत...
Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पदयात्रा निघाली आहे. मात्र, या यात्रेच्या पूर्वसंध्येपासूनच मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची भावना आहे.

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या आंदोलनात येवल्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याची तयारी सुरू असतानाच लासलगाव पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संतापले असून पदाधिकाऱ्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Maratha Aarakshan Mumbai Morcha : मी असेन नसेन...; मनोज जरांगेंचे डोळे पाणवले

सकल मराठा समाजाचे नेते डॉ. सुजित गुंजाळ, गोपीनाथ ठुबे, सुरेश ठुबे, प्रसाद फाफाळे, अमित मुद्गुल, शंकर साळवे, सुशांत भोसले, सुनील चतुर आदी दाधिकाऱ्यांना पोलिसांनी कलम 109, 143, 149 आणि 500 अन्वये गुन्हा दाखल असल्याने नोटीस बजावली आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात हजर होऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजपासून (शनिवार) सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात गावोगावी धान्य जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि इतर वस्तू आझाद मैदानावरील आंदोलकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. किमान दहा हजार कार्यकर्ते पुणे, तसेच थेट मुंबई मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होतील. त्यासाठी पदाधिकारी कामाला लागले असतानाच त्यांना नोटीस मिळाल्याने सकल मराठा समाजाने संताप व्यक्त केला आहे. नोटीस न स्वीकारण्याची भूमिका असून याबाबत प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे डॉ. गुंजाळ यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

(Edited By Roshan More)

R...

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Shivsena Vs BJP : निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्याच्या नावाने फसवी पेन्शन योजना ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com