Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha: अजितदादांचा सातारा मतदारसंघ घेऊन भाजपकडून नाशिकसाठी शिंदे गटाची कोंडी?

Lok Sabha Election 2024: नाशिक आणि सातारा या दोन मतदारसंघांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव आहे. पवार गटाच्या सातारा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळावी असे प्रयत्न आहेत.

Sampat Devgire

Nashik Lok Sabha Constituency 2024: राज्यातील पाच मतदारसंघांच्या जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये नाशिक मतदारसंघ (Nashik Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची उमेदवारी जाहीर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीने लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत कोणते धोरण आखले हा वादाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. तीनही पक्ष ठराविक मतदारसंघांवर सातत्याने दावा करीत आले आहेत. विशेषतः स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार आग्रही आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये नाशिक मतदारसंघ सर्व मित्रपक्षांनी प्रतिष्ठेचा केला आहे. भाजपसह (BJP) तिन्ही पक्षांना हा मतदारसंघ हवा आहे, तर काल रात्री झालेल्या चर्चेत नाशिकची (Nashik) जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडावी लागणार अशा पद्धतीने वातावरण होते. त्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत महायुतीकडून काय घोषणा होते, याची उत्सुकता आहे.

नाशिक आणि सातारा या दोन मतदारसंघांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सातारा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळावी असे प्रयत्न आहेत.

राज्यातील ओबीसी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रस्ताव आहे. त्यावर गेले दोन आठवडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.

मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. भुजबळ यांची प्रचारातील उपयुक्तता लक्षात घेऊन भाजप नाशिकचा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याच्या मानसिकतेत आहे. असे झाल्यास भुजबळ यांचा उमेदवार म्हणून नाशिक मतदारसंघातून प्रबळ दावा असेल.

दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने मतदारसंघावरील आपला दावा सोडण्यास नकार दिला आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यांचा प्रचारदेखील सुरू आहे. अशा परिस्थितीत गोडसेंना विरोध असल्यास माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांना उमेदवार म्हणून पसंती मिळू शकते.

तर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे विजय करंजकर यांनादेखील शिंदे गटाने मधाचे बोट लावले आहे. मात्र, शिंदे गटावर गद्दार असा जोरदार आरोप करीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना हैराण केलेल्या करंजकर यांना पक्षाने प्रवेश दिल्यास विरोधकांना आयता मुद्दा मिळू शकतो.

त्यामुळे शिंदे गट कोणाला उमेदवारी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे. त्याचबरोबर दोन आठवडे लांबलेल्या नाशिक मतदारसंघाचा निर्णय आणि उमेदवार आज तरी ठरणार का? असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT