Narendra Modi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Modi visit to Nashik : ...म्हणून पंतप्रधान मोदींचे नाशिकमध्ये दुपारी नाही, सकाळीच आगमन होणार!

सरकारनामा ब्युरो

अरविंद जाधव -

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यापूर्वी त्यांचा नियोजीत दौरा दुपारी साडेबारा वाजेपासून सुरू होणार होता. पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये केंद्रीय मंत्र्यासह राज्यमंत्री मंडळ हजर होण्यास सुरूवात झाली आहे.

27व्या राष्ट्रीय युवा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Modi) नाशिकमध्ये येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान गोदाआरतीसह काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार की नाहीत, असा प्रश्न होता. मात्र, भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या आग्रहामुळे पंतप्रधान कार्यालयाने या दौऱ्यास हिरवा कंदील दर्शवला. तसेच त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर हायवेवर मोदींचा मोठा रोड शो सुद्धा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र साडेबारा वाजेनंतर नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी आले तर पुढे मुंबईच्या कार्यक्रमांना उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला. आता मोदी सकाळी सव्वादहा वाजताच नाशिकमध्ये येतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विशेष म्हणजे आज सकाळीच पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यावरून टीका केली होती. उद्धव ठाकरे 23 तारखेला काळाराम मंदिरात जाणार आहे. त्यामुळे भाजपने अचानक या दौऱ्याचे आयोजन केले. शिवसेना जे करते, तेच भाजप करते. आम्ही मणिपुरच्या राम मंदिरात जाणार आहोत, तिकडे पंतप्रधान येतील काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप नेत्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

राष्ट्रीय युवा अभियानाच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीचा कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेनेचे (शिंदे गट) वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अत्यंत कमी वेळेत या सोहळ्याचे आयोजन होत असल्याने वरिष्ठ नेते दिवस-रात्र काम करतानाचे चित्र समोर येते आहे.

नाशिकमध्ये उद्या भव्यदिव्य सोहळा होत असताना मंत्री Chhagan Bhujbal यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात ते एकदाही समोर आलेले नाहीत. किंबहुना अजित पवार गटच या सोहळ्यापासून अद्याप दूर राहिल्याचे दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT