Narendra Modi Road Show  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Modi Nashik Tour : नाशिककरांच्या प्रेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसात...!

Narendra Modi Road Show : 'रोड शो'च्या माध्यमातून अभिवादन स्वीकारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिंकली नाशिककरांची मने...

Sampat Devgire

Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत 'भारतमाता की जय'चा जयघोष करीत आसमंत दुमदुमून टाकला. मोदी यांच्या या 'रोड शो'ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज पाहायला मिळाले. (Prime Minister Narendra Modi's road show in Nashik)

प्रधानमंत्री मोदी यांचे सकाळी साडेदहाच्या सुमारास निलगिरीबाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या 'रोड शो'ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकच्या युवावर्गाने केलेली गर्दी, महिलावर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी या आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत, तसेच उपस्थितांना अभिवादन करीत मोदी यांचा ताफा तपोवनकडे गेला. जागोजागी थांबलेले नाशिककर आपल्या प्रधानमंत्र्यांचे उत्साहात स्वागत करत होते.

लेझीम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करीत विविध पथके या मार्गावर मोदी यांचे स्वागत करीत होती. प्रधानमंत्री मोदी यांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. लेझीम पथक, ढोल पथक आणि विविध वेशभूषांतील युवक-युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भरून गेला होता. प्रधानमंत्री मोदी यांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परिसरातील वातावरण चैतन्याने भारून गेले होते.

हॉटेल मिर्ची ते तपोवनपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर अमाप उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे घेत युवकांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बालवारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविधरंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT