पुणे : जब तक देश मे है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ऑंधी,तब तक कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहूल गांधी अशी कविता करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत रंगत आणली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावरील सत्तेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही कविता सादर करून पुन्हा लवकर सत्तेत येणे कॉंग्रेसच्या दृष्टीने अवघड असल्याचे म्हटले.पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तमपणे काम करीत असून येत्या निवडणुकी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.(As long as there is a storm of Prime Minister Narendra Modi in the country How will Rahul Gandhi become Prime Minister till then?)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल विश्वासघाताचे आरोप कुणी करीत असले तरी मला स्वत:ला त्यांचा चांगला अनुभव असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मात्र, त्यांना लोक बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पवार यांनी याबाबत खुलासा करून भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील समावेशावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘ पंकजा मुंडे या भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ही त्यांची खरी ओळख आहे. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे राजकारणात चढउतार असतात. मात्र, पंकजा यांनी सध्याची परिस्थिती संयमाने हाताळायला हवी.’’
मराठा व ओबीसी या दोन्ही आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका अधिक सजगपणे बजावली पाहिजे.या दोन्ही घटकांना आरक्षण मिळायला हवे. मात्र. सध्याच्या इतरांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये, असे आठवले यांनी स्पष्ट केले. जनगणना करताना जातीनिहाय गणना व्हायला हवी या भूमिकेवर आपण ठाम आहोत. त्यातून जातीयता वाढेल, अशी भीती घालण्यात येत असली तरी ही भीती चुकीची आहे. उलट या जनगणनेमुळे जातीच्या लोकसंख्येबाबत अधिक स्पष्टता येईल, असे मुंडे यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.