Narendra Modi Nashik Road Show : पंतप्रधान मोदींच्या 'रोड शो'ला उसळली लोकांची गर्दी; शिंदे-फडणवीस-पवार हजर...

Narendra Modi Nashik Tour : निलगिरीबाग येथे स्वागताला जमलेल्या उपस्थितांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला.
Narendra Modi Nashik Road Show
Narendra Modi Nashik Road Show Sarkarnama

Nashik News : नाशिक शहरातील निलगिरीबाग येथून सुरू झालेल्या रोड शोला रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी उसळली होती. श्रीरामाचे चिन्ह असलेले भगवे ध्वज आणि तिरंगा झेंडा घेतलेल्या नागरिकांनी मोदी यांच्याविषयी घोषणा दिल्याने खुद्द पंतप्रधान मोदीदेखील या दौऱ्याच्या नियोजनावर बेहद्द खूश दिसल्याचे चित्र होते. (Latest Marathi News)

Narendra Modi Nashik Road Show
Nashik BJP Vs NCP : नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून अजित पवार गट Vs भाजपमध्ये संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दौरा सकाळी सुरू झाला ते निलगिरीबाग ते तपोवन रोड या 1.7 मीटरच्या अंतरात रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. निलगिरीबाग येथे स्वागताला जमलेल्या उपस्थितांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील नाचणाऱ्यांसोबत ठेका धरला होता. बराच वेळ ते नाचत होते, त्यामुळे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी पंतप्रधान यांच्या वाहनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. सर्वांनी रोड-शोदरम्यान उपस्थितांना हात उंचावून प्रतिसाद दिला. "आजचा दिवस फक्त नाशिक शहर नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अतिशय वेगळा आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकला आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नाशिककर त्यांचे स्वागत करण्यात उत्सुक आहे. त्यात मीदेखील सहभागी झालो मला आज खूप आनंद वाटतो आहे," अशी प्रतिक्रिया पालकमंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

Narendra Modi Nashik Road Show
Satara PM Modi News : पंतप्रधान मोदी साधणार कातकऱ्यांशी संवाद; जन-मन योजनेचा 845 कुटुंबांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरीबाग येथे आगमन -

27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरीबाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानमहोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com