MLA Sanjay Savkare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

तरूणांनो, स्वतःचा उद्योग उभारून इतरांना नोकरीच्या संधी द्या!

वरणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांनी युवकाना आवाहन केले.

Sampat Devgire

वरणगाव : खासगीकरणामुळे शासकीय (Government) सेवेतील संधी कमी होत आहे, तर खासगीकरणामुळे कामाच्या तासिका वाढल्या आहेत. त्या तुलनेत मिळकत कमी आहे. कामाच्या व्यापामुळे तरुण पिढी दबली गेली आहे. यामधून सुटका पाहिजे असेल, तर तरुणांनी उद्योगाच्या संधी हेरल्या पाहिजेत. त्यामधील शिक्षण (Education) घेतले पाहिजे व स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यामुळे स्वतःसोबतच इतरांनाही स्वावलंबी बनवू शकतात. यासाठी तरुणांनी उद्योग क्षेत्रास पसंती दाखवली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांनी येथे केले.

संत रोहिदास जयंतीनिमित्त येथील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय भटकर, फुलगावच्या सरपंच वैशाली टाकोळे, सी. एस सपकाळे उपस्थित होते.

आमदार सावकारे म्हणाले, की तरुणांना रोजगाराच्या संधी शोधून त्यासाठी बँकेकडे कर्ज मागणी केल्यास भाग भांडवल उपलब्ध करता येऊ शकते. मात्र, या भांडवलाचा योग्य पद्धतीने उपयोग करून त्याची परतफेड केल्यास पुन्हा नव्याने पुढील उद्योगात वाढ होण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते.

यावेळी डॉ. संजीव भटकर म्हणाले, की समाजाची प्रगती झाली. मात्र, आपल्यातील संवेदना बोथट झाल्या आहेत. अजूनही आपले बांधव आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहेत. जे पुढे गेलेत, त्यांनी इतरांसाठी पुढाकार घेऊन त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. यामुळेच समाजाची प्रगती होऊ शकते.

यावेळी शांताराम सुरळकर, राजेंद्र परसे, अनिल डोयसे, महेश सपकाळे, गणेश चिमणकर, नारायण वाघामारे, योगेश सुरळकर, भरत निंबाळकर, ज्ञानेश्वर डांगे, भिमराव गव्हाळे, संजय डोळसे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT