Bhausaheb Hiray & Swatantraveer Savarkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Students Politics: पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याआधीच नामकरणावरून वाद पेटला! विद्यार्थी संघटना भिडल्या!

Pune University; Dispute over name between Bhausaheb Hire and Swatantryaveer Savarkar supporters-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेने नाशिकच्या उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाव देण्याचा ठराव केला आहे.

Sampat Devgire

Nashik Politics: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे नामकरण करण्याबाबतचा ठराव नुकताच अधिसभेत झाला. या ठरावावरून दोन गट पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनांत चांगलेच राजकारण रंगले आहे.

पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र काही सदस्यांनी आक्षेप घेत त्याला विरोध केला. त्यामुळे गेल्या आठवड्यावर या विषयावरून राजकीय नेत्यांत वाद रंगला आहे. आता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचला.

आता या वादात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पणतूने उडी घेतली आहे. माजी आमदार आणि सध्याचे सिनेट सदस्य डॉ अपूर्व हिरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना करणे बरोबर नाही, असे ते म्हणाले.

माजी आमदार डॉ हिरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे एका उपकेंद्रात त्यांचे नाव देणे बरोबर होणार नाही. त्याऐवजी नाशिकलाच असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे. ते योग्य होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थोर कार्याचा नाशिककर म्हणून आपल्याला यथोचित सन्मान केला पाहिजे. त्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला त्यांचे नाव देणे अत्यंत गरजेचे आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकला विद्यापीठ उपकेंद्र असले तरीही त्याचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हेच नाव राहणार आहे. फक्त उपकेंद्राला भाऊसाहेब हिरे परिसर असे म्हटले जाणार आहे.

नाशिक उपकेंद्रास भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यावर त्याला सावरकर समर्थकांनी विरोध केला होता. सिनेट समितीच्या बैठकीत देखील त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या नावाचा फलक तयार करून तो थेट विद्यापीठ उपकेंद्रालाही लावला. कर्मवीर हिरे आणि सावरकर समर्थकांत या विषयावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी या वादावर नाराजी व्यक्त केली आहे. ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग आणि राष्ट्रसेवा दलाचे ॲड शरद कोकाटे यांनी उपकेंद्र नाव देणे योग्य होणार नाही. विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हेच नाव नाशिक केंद्रालाही ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

जवळपास सर्वच राजकीय विचारांच्या संघटनांनी या वादात उडी घेतली. त्यामुळे नाशिकचे उपकेंद्र सुरू होण्याआधीच वादात सापडले आहे. आधीच या केंद्राची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. आता त्यात राजकीय अडथळे निर्माण झाले आहे. उपस्थितीत हे उपकेंद्र केव्हा कार्यरत होणार हा चर्चेचा विषय आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT