Nashik NCP leader Purushottam Kadlag released from jail Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : दोन महिन्यांनी तुरुंगाचे दरवाजे उघडले... शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची सुटका; पण पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक!

Trimbakeshwar VIP Darshan Scam Purushottam Kadlag : त्र्यंबकेश्‍वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केली जात होती. या दर्शन काळाबाजाराचे धागेदोरे थेट विश्वस्त कडलग पर्यंत पोहोचले.

Ganesh Sonawane

Purushottam Kadlag Grants Conditional Bail : त्र्यंबकेश्‍वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मंदिराचे विश्वत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना (१५ एप्रिल २०२६)रोजी पोलिसांनी अटक केली होती.

याप्रकरणात दोन महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या पुरुषोत्तम कडलग यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने हा जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाचे स्थान आहे. त्यामुळे देशभरातून मोठ्या संख्यने येथे भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी मोठ मोठ्या रांगा लागतात. मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केली जात होती. पंरतु भाविक पोलिसांत तक्रार देत नसल्याने हा प्रकार समोर येत नव्हता.

त्यामुळे त्र्यंबक पोलिसांनी मंदिर परिसरात स्टिंग ऑपरेशन राबवून व्हीआयपी दर्शनातून भाविकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये पोलिसच भाविक बनून गेले होते. दहा मिनिटात दर्शन करुन देतो असे आमिष दाखवत भाविकांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची लूट होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं.

धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मंदिराचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्याचे पुतणे ओम व अभिषेक कडलग, एजंट गोटीराम पेहरे, नारायण मुर्तडक यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कडलगने आधी कनिष्ठ व सत्र न्यायालयात जामीनासाठी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही न्यायालयांनी जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर कडलगने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी (दि. २५) सुनावणी होऊन न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना कोर्टाने दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

या आहेत अटी

- 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह पुरुषोत्तम कडलग यास दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक केली आहे.

-तसेच, गुन्ह्याशी संबंधित चौकशीला सहकार्य करण्यासह या गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटी-शर्तींवर कडलग यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT