Pune Police News: जो गुन्हा केलाच नाही, त्यात शरद पवारांच्या नेत्याला अटक! पुणे पोलिसांच्या कारभारावर सवाल

NCP Leader Vikas Lavande Arrest Case: विकास लवांडे यांच्या अटक प्रकरणात पुणे पोलिसांनी चुकीचा गुन्हा जोडल्याची बाब कोर्टात मान्य केली. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या गुन्ह्याशी काहीही संबंध नव्हता, तो गुन्हा थेट एका राजकीय नेत्याच्या नावावर टाकला गेला आणि त्याच आधारे अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे ही चूक झाल्याचे अखेर पोलिसांनाच कोर्टात मान्य करावे लागले. त्यामुळे “ही फक्त नजरचूक की एखाद्याला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lavande) यांना वाघोली पोलिसांनी अटक केली होती. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधूनच मोठा गौप्यस्फोट झाला.

लवांडे यांच्या विरोधात पोलिसांनी २०१७ मधील एका जुन्या गुन्ह्याचा उल्लेख केला. मात्र तो गुन्हा प्रत्यक्षात त्यांच्या विरोधात नव्हताच. तो गुन्हा गौतम कांबळे नावाच्या व्यक्तीवर दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी दाखल झाला होता. तरीही तोच गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर दाखवत अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यात आल्याचे समोर आले.

Pune Police News
Sunil Shelke News: मावळला पुन्हा ‘लाल दिवा’? राष्ट्रवादीच्या आमदाराला विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी!

धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी कोर्टात ही “नजरचूक” असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण एवढ्या संवेदनशील प्रकरणात अशी गंभीर चूक कशी होऊ शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एखाद्या सामान्य नागरिकाच्या बाबतीत अशी चूक झाली असती, तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या तपास पद्धतीवर आणि कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखाद्या व्यक्तीवर आधीचे गुन्हे दाखवून न्यायालयात त्याच्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

Pune Police News
MPSC Typing Test Cancelled: MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आता टायपिंग टेस्ट नाही

विशेष म्हणजे, ज्या गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला तो गुन्हा २०२२ मध्येच मागे घेण्यात आला होता. तरीही तो चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच अशी बेफिकिरी होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विकास लवांडे अटक प्रकरणामुळे सध्या पुणे पोलिसांची कार्यपद्धतीच चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com