ACB Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule ACB News: PWD च्या अभियंत्याने वीस हजारांसाठी कंत्राटदाराला अक्षरशः छळले!

PWD Engineer Arrested by ACB for Bribe- त्रस्त झालेल्या कंत्राटदाराच्या तक्रारीमुळे लघुपाटबंधारे विभागातील अभियंत्याला अटक

Sampat Devgire

ACB Dhule News : शहादा येथील लघुपाटबंधारे विभागात केलेल्या तीन कामांची बिले काढण्यासाठी २० हजारांची लाच मागून १९ हजार ५०० रुपये स्वीकारताना शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता तथा उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचा पदभार असलेल्या दिनेश केशवराव पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (PWD department`s Engineer arrested by police)

यासंदर्भात नाशिक (Nashik) विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागामागे अभियंत्यांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी थेट लाच मागितली. यामध्ये तसे नवे काहीच नाही. शासनाच्या अनेक विभागात ही वाहिवाटच आहे. मात्र, वीस हजारांच्या लाचेसाठी या अभियंत्यांने कंत्राटदाराला एवढे छळले, की असह्य होऊन त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी लागली.

तक्रारदारांनी २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. तिन्ही कामांची बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५ हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदाराकडून याआधीच घेतली आहे.

उर्वरित २० हजार रुपयांसाठी पाटील याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम त्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. पाटीलला सोमवारी जिल्हा परिषदेच्या नंदुरबार येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली.

त्याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोलिस हवालदार विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, महिला पोलिस हवालदार ज्योती पाटील, पोलिस नाईक संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांच्या पथकाने कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT