Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोजापूर चारीला पाणी सुटले अन् विखे-थोरातांची श्रेयवादाची लढाई सुरू !

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : संगमनेर तालुका भोजापूर धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी गावोगावी आंदोलन सुरू करून लढा उभा केला. त्यांच्या लढ्यापुढे अखेर सरकारला नमतेपणा घेत भोजापूर चारीला पाणी सोडावे लागले. परंतु, हे पाणी आपल्याच प्रयत्नाने सुटले अशी श्रेयवादाची लढाई महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात सुरू झाली आहे.

गेली अनेक वर्षे भोजापूर पाण्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकरी लढा देत आहेत. यावर्षी पाऊस नसल्याने भोजापूर धरणाचे भोजापूर चारीच्या माध्यमातून पळसखेडे, निमोण, पिंपळे सोनेवाडी, क-हे, सोनोशी, नान्नज, दुमाला, या दुष्काळग्रस्त गावांपर्यंत पोहोचले पाहिजे. या मागणीसाठी वरील गावांतील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनीच आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभा केला. गावोगावी आंदोलने सुरू केली होती.(Balasaheb Thorat News)

प्रशासकीय स्तरावरती निर्णय होत नव्हता. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात भोजापूर धरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी सोडण्याबरोबरच चारीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश दिले होते.(Latest Marathi News)

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत पाणी सोडण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार भोजापूर धरणातून दुष्काळी पट्ट्यातील भोजापूर चारीला पाणी सोडण्यात आले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासन स्तरावर भोजापूर धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण सक्त आदेश दिल्यामुळेच या भोजापूर चारीला पाणी सुटले आहे, असे विखे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, भोजापूर पाटचारीचे काम करण्यासाठी आमदार थोरात यांनी शासन दरबारी सतत पाठ पुरावा केला आहे, त्यामुळे भोजापूर पाटचारीला थोरात यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यानेच पाणी सुटले असल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते भीमाशंकर चकोर यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला नमतेपणा घेत हे पाणी सोडावे लागले आहे. यात खरे श्रेय शेतकऱ्यांचे आहे. मात्र, विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या दोघांमध्येच पाणी माझ्यामुळे सुटले. याचे श्रेय घेण्यासाठी या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT