Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे-पाटील संतापले, बदनामीचा गुन्हा दाखल करणार...

Pradeep Pendhare

Nagar ः राज्यातील तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. ही मागणी करणाऱ्या विरोधकांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे चांगलेच संतापले आहे. थेट बदनामीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हजारो मुलांच्या जीवाशी आपण खेळत आहात. कोणी मागणी केल्याने परीक्षा रद्द होणार नाही. परीक्षा ही पारदर्शकतेने पार पडली आहे. तलाठी भरतीसंदर्भात कोणतीही खुली चौकशी करा. त्याला सामोरे जाण्याची तयारी आहे. तलाठी भरतीवरून विरोधकांनी केलेले आरोपसिद्ध करा नाहीतर सरकारची बदनामी केली म्हणून खटल्याला समोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा मंत्री विखे यांनी दिला.

राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी झळकली. ती देखील वादात अडकली आहे. इतर परीक्षांमध्ये 75 गुणांवर गुण न मिळाणाऱ्यांना 200 पेक्षा जास्त गुण तलाठी परीक्षेत मिळाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या उमेदवारांचे देखील नावे पुन्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. यामुळे तलाठी भरतीवरून पुन्हा राज्यात गदारोळ सुरू झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यार्थी संघटनांबरोबर राजकीय विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा लावून ठरला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विशेष तपास पथकाकडून चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरतीवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक पदवीधर मतदासंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील तलाठी परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सर्व आरोपांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संताप व्यक्त केला.

'सरकारची बदनामीसाठी हे प्रयत्न सुरू आहेत. खासगी कंपनीमार्फत 75 हजार पदे भरण्याची प्रक्रिया राज्यात सुरू आहे. ही भरती प्रक्रिया आॅनलाईनपद्धतीने सुरू आहे. त्यामुळे यात कोणालाच हस्तक्षेप करायला संधी नाही. 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले आहेत त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात खटला दाखल करत आहोत.' असे विखे म्हणाले.

चौकशीला सामोरे जाऊ

विरोधक करत असलेले आरोप हे निव्वळ प्रसिद्धीसाठी आहेत. परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असली, तरी ती होणार नाही. जी प्रक्रिया पारदर्शकतेनी पार पाडली. ती रद्द का करायची. समिती स्थापन करून चौकशी करण्याच्या मागणीवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चौकशी समिती नेमल्यास त्याला देखील समोरे जाण्याची तयारी आहे, असेही मंत्री विखे म्हणाले.

कायदा करण्याची मागणी

दहा दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत एकादा परीक्षार्थी नापास होतो आणि तोच परीक्षार्थी तलाठी परीक्षेत टाॅपर कसा होतो, हे धक्कादायक आहे. सरकारी भरतीत राज्य सरकार आणि लोकसेवा आयोग वेगवेगळे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार करत आहेत. परंतु परीक्षेतील गैरप्रकार बंद होत नाही. परीक्षेतील घोटाळे वाढलेच आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेपर फुटीविरोधात राज्यात कठोर कायदा करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT