Raju Shetti : तलाठी भरती परीक्षा कशा पारदर्शक झाल्या हे दिसून येते...! राजू शेट्टींचा सरकारला टोला...

Talathi Recruitment Process : भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घेण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.
Ajit Pawar, Raju Shetti
Ajit Pawar, Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Raju Shetti : राज्य सरकारने सरळसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना 200 गुणांच्या पेपरला 214 गुण पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे दिसून येते.

यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्याव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली. गेल्या अनेक वर्षांपासून सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये ज्या कंपन्यांमार्फत पेपर घेतले जातात त्या घोटाळा करतातच, हे बऱ्याचवेळेस सिद्ध झाले आहे.

Ajit Pawar, Raju Shetti
Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयाने थेट विदर्भाच्या रेल्वे विभागालाच केली विचारणा की...

यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येऊन शासनास परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुद्धा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे, असे जर सरकारचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर या निकालपत्रातील 200 पैकी 125 पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परीक्षा घेऊन पात्रता सिद्ध करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल, असे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R...

Ajit Pawar, Raju Shetti
Prakash Ambedkar MVA Politics : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ' नेत्यांना 'हा' थेट सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com