BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : ‘स्थानिक’मध्येही शत प्रतिशत भाजप; मंत्री विखे म्हणाले, 'आता माघार नाही...'

Radhakrishna Vikhe Patil Ahilyanagar Upcoming Local Self Government Elections : भाजप स्थापनादिनाच्या कार्यक्रमात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी लागण्याच्या सूचना केल्या.

Pradeep Pendhare

BJP Preparation in Local Body Elections: भाजपने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी तयारी लागा, असा सूचना केल्या. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शत प्रतिशत भाजप, अशी घोषणा मंत्री विखे पाटलांनी दिली.

भाजपच्या (BJP) स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटलांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांशी दूरदृश्‍य प्रणालीने सहभागी झाले होते. बूथ पातळीवर ताकद वाढवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकण्याची तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री विखे पाटील यांनी केल्या.

मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) पाटील म्हणाले, "भाजप हा देशातील सर्वांत मोठा आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष झाला आहे. जनतेने विचारधारा आणि प्रगती या दोन मुद्यांच्या आधारे भाजपला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर बसविले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतिशत भाजपसाठी आपणा सर्वांना बूथ पातळीवर संघटन मजबूत करून तयारी सुरू करावी".

विखे पाटील यांनी भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य आहेत. त्यात शिर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी 70 हजार सदस्य केले. त्यामुळे जिल्ह्यात आपण अव्वल आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील अव्वल राहण्यासाठी परिश्रम गरजेचे आहेत, असे सांगितले.

हिंदुत्वावरून ठाकरेंना टोला

वक्फ विधेयक बिल दुरुस्तीवर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी वक्फ बोर्डाद्वारे जमिनी बिल्डरला देण्याचे आणि हिंदूंच्या जमिनींवर ताबा करण्याचे काम सुरू होते. मूठभर मंडळी सोडली, तर एकाही सामान्य मुसलमानाचा त्यातून विकास झालेला नाही. त्यामुळे या कायद्यात सुधारणा करावी लागली. या विधेयकाला विरोध केल्याने उद्धव ठाकरे यांना आता हिंदुत्ववादी म्हणून घेता येणार नाही, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT