Balasaheb Thackeray Arrest Bhujbal Clarification: निवृत्त एटीएस चीफ के. पी. रघुवंशी यांनी पुस्तक लिहिले आहे. पुस्तकातील काही उल्लेख वादाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पुस्तकातील दावे चर्चेचा विषय ठरत आहेत.
एटीएस प्रमुख राहिलेले निवृत्त आयपीएस अधिकारी के. पी. रघुवंशी यांचे हे पुस्तक आहे."ट्रबलशूटर: द अनटोल्ड एन्काऊंटर्स ऑफ आयपीएस ऑफिसर के पी रघुवंशी"या पुस्तकातील काही राजकीय घटना आता वादाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हे पुस्तक चर्चेत आले आहे.
मुंबई दंगल आणि संबंधित घटनांबाबत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाबाबत पुस्तकात उल्लेख आहे. अहवालानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी दबाव होता. त्यावेळी छगन भुजबळ हे गृहमंत्री होते असा उल्लेख के पी. रघुवंशी यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसंदर्भात ही गंभीर माहिती आहे. त्याचा संबंध तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याशी आहे. त्यामुळे भुजबळ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना अटक करण्याबाबत माझा कोणताही दबाव न होता. संदर्भात माझ्याकडे पोलीस आयुक्तांकडूनच शिफारशीसह फाईल आली होती. फायलीच्या दृष्टीने न्यायालयाने जामीन नाकारल्यास शिवसेनाप्रमुखांना मातोश्री हेच कारागृह समजून तेथे ठेवण्यात येईल. शिवसेनाप्रमुख ठाकरेंना त्रास देऊ नये, असे माझे मत होते, असे भुजबळ म्हणाले.
मंत्री भुजबळ म्हणाले, शिवसेना, भाजप युतीचे सरकार असताना अनेक फाईल आणि कारवाया रद्द झाल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाकडून नेमकी तीच फाईल माझ्यापुढे आली होती. मुळे माझी दोन्ही बाजूंनी अडचण झाली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करावी असे आपले मत नव्हते. त्यामुळे पोलीस आयुक्तांना त्या अनुषंगाने या प्रसंगातून मार्ग काढण्यास सांगितले होते. अटक करण्याबाबत आपण कोणताही दबाव टाकला नव्हता. याउलट ठाकरे यांच्या विरोधात जो खटला दाखल केला होता तो देखील आपण मागे घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यासंदर्भात पुस्तकातील उल्लेखानुसार आयपीएस अधिकारी रघुवंशी यांनी आपल्या या आत्मचरित्रात भुजबळ त्यावेळी गृहमंत्री होते. त्या काळातील काही घटना पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत.
त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. मी मात्र या संदर्भात कायदेशीर सल्ल्यानुसार अटक करणे योग्य नव्हते. कारण कोणीही साक्षीदार समोर आलेले नाहीत, अशी भूमिका घेतल्याचे रघुवंशी नमूद करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.