Radhakrishna Vikhe criticizes Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe criticizes Sharad Pawar : शरद पवार वारंवार 'लक्ष्य'; तरीही मंत्री विखेंना सूर गवसेना की, अन् काही..!

Radhakrishna Vikhe Criticizes Sharad Pawar at Vitthalrao Vikhe Patil Sugar Factory Meeting in Pravaranagar : अहिल्यानगर राहाता प्रवरानगर इथल्या डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

Pradeep Pendhare

Sharad Pawar criticism Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शरद पवार यांना वारंवार लक्ष्य करताना दिसत आहे. शरद पवार यांच्यावर टिका करताना, मंत्री विखे पाटलांना सूर काहीसा गवसेना झाला आहे. मंत्री विखे पाटलांच्या कोणत्याच आरोपांना शरद पवारांकडून कोणतेच प्रत्युत्तर मिळत नसल्याने ही टिका का? अशी कुजबूज सुरू आहे.

तर पुढील चार महिन्यात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहे. शरद पवारांनी मुंबईतील एका कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हा बँकेविषयी चिंता व्यक्त केली होती. भाजपच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेवर शरद पवार यांचं बारीक लक्ष असल्याने, अन् निवडणुकीत चमत्कार करण्याची क्षमता असल्याने, मंत्री विखे पाटलांकडून शरद पवारांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याचे विश्लेषकांचे निरीक्षक आहे.

जिल्हा सहकारी बँकेत सुरूवातीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात समर्थकांची सत्ता होती. परंतु फोडाफोडीच्या राजकारणात जिल्हा सहकारी बँकेत सत्तांतर झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा बँक काबीज केली. बँकेचा कारभार भाजप आमदार शिवाजी कर्डिले पाहात आहेत. आता जिल्हा बँकेच्या निवडणुका पुढील चार महिन्यात होत आहेत.

जिल्हा बँकेची निवडणुकीपुर्वी शेवटची वार्षिक सभा नुकताच झाली. भाजप (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वार्षिक अहवालात छायाचित्र सुरूवातीला न छापल्याने वाद झाला होता. शेवटी वार्षिक अहवाल पुन्हा छापावे लागले. कधीही बँकेच्या राजकारणात, निवडणुकीत लक्ष न घालणारे प्रा. राम शिंदे यांनी वार्षिक सभेला हजेरी लावत, यावेळी आपण लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले.

राम शिंदे यांच्या या भुमिकेमुळे जिल्हा बँकेचे राजकारण निवडणुकीपूर्वीच तापू लागले आहे. या सर्वात थोरात समर्थक शांत राहा आणि वाट पाहा, या भूमिकेत आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आगामी राजकारणाची चाहूल ओळखणारे! त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवार यांना लक्ष्य करत आहे. जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत देखील त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच राहाता प्रवरानगर इथल्या पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मंत्री विखे पाटीलांनी शरद पवार यांच्यावर टिका केली.

'रयत' अन् 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'मध्ये भ्रष्टाचार

सहकारी साखर कारखान्याच्या सभेत शरद पवार यांच्यावर टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, "राज्याच्या राजकारणातील 'जाणता राजा'ने सहकारी संस्था मोडण्याचे काम केले. सहकारी चळवळींचा वापर राजकीय दडपशाही आणि राजकीय स्वार्थासाठी केला. सहकाराच्या नावाखाली 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्थासुद्धा त्यांनी राजकीय अड्डा करून ठेवली. ही इन्स्टिट्यूट अन् रयत शिक्षण संस्था घरातील लोकांच्या ताब्यात दिल्याने या दोन्ही संस्थांमध्ये मोठा भ्रष्टाचार वाढला."

'जाणता राजा'ची 'प्रायव्हेट लिमिटेड'

'राज्यातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था 'जाणता राजा'नी 'प्रायव्हेट लिमिटेड' करून राजकीय अड्डा केली आहे. ऊसबद्दल कोणतेही संशोधन नाही. बदलत्या तंत्रज्ञानावर मार्गदर्शन नाही. हार्वेस्टरसुद्धा बाहेरून घ्यावे लागतात,' असा घणाघात मंत्री विखे पाटील यांनी केली.

जिल्ह्यात ढवळाढवळ बंद करा

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत मंत्री विखे पाटील यांनी शरद पवारांना निशाणा केलं होतं. मुंबईतील महानगर बँकेच्या कार्यक्रमात, शरद पवार यांनी जिल्हा बँकेविषयी चिंता व्यक्त केली होती. तो धागा पकडून मंत्री विखे पाटील यांनी, ''जाणता राजां'नी जिल्हा बँकेची चिंता करण्याऐवजी स्वतःची चिंता करावी. जिल्ह्याची चिंता करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. बाहेरच्या लोकांची गरज नाही. बाहेरच्यांनी जिल्ह्यात ढवळाढवळ करू नये,' असा हल्लाबोल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT