Rahul Gandhi Nyay Yatra Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatara in Maharashtra : राहुल गांधींच्या न्याय यात्रेत फडकणार काँग्रेसचा सर्वात मोठा झेंडा...

Sampat Devgire

Nashik Congress news : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात नंदुरबार येथे दाखल झाली. या यात्रेनिमित्त काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. धुळे आणि नाशिकसह ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे मोठे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. यात विशेष म्हणजे सर्वात मोठा काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी यांचे शहरात द्वारका येथे आगमन झाल्यावर त्यांचा रोड शो सुरू होईल. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर राहुल गांधी यांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने नाशिकच्या काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आठ फूट उंच आणि 138 फूट रुंद असा सर्वात मोठा ध्वज तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा ध्वज सर्वात मोठा ध्वज ठरेल आणि त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, असे या कार्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत. वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न म्हणून राहुल गांधी यांच्या नाशिकच्या स्वागताची चर्चा व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली. त्याला शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी यांचा दौरा आणि पहिल्यांदाच नाशिकमध्ये होत असलेला त्यांचा कार्यक्रम यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत या दौऱ्याची माहिती पोहोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीत प्रदेश संघटक आर. आर. पाटील, लक्ष्मण धोत्रे, धोंडीराम बोडके, पोपटराव नागपुरे, प्रा. भालचंद्र पाटील, करुणाताई पटेल, सिद्धा गांगुर्डे आदिमसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाशिक शहरात आगमन झाल्यावर त्यांची भारत जोडो न्याय यात्रा द्वारका चौकात येईल तेथे स्वागत झाल्यावर रोडशो सुरू होईल. हा रोड शो द्वारका, सारडा सर्कल, दूध बाजार, मेन रोड, शालिमार या मार्गे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ येईल. येथे राहुल गांधी नागरिकांना संबोधित करतील.

भारत जोडो न्याय यात्रेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha) राहुल गांधी यांचे सर्व कार्यक्रम अतिशय घाई गर्दीत उरकले जात आहेत. यामध्ये नाशिकच्या सेवा दल कार्यकर्त्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या काँग्रेसचा सर्वात मोठा ध्वज हा एक वेगळा उपक्रम म्हणून चर्चेत येण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT