Rahuri Bypoll Sujay Vikhe Warning Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll : गाफिलपणा महागात पडतो! संगमनेरचा दाखला देत, विखेंनी कर्डिलेंना केलं सावध

BJP leader Sujay Vikhe advises Akshay Kardile to stay alert in Rahuri by-election, citing Balasaheb Thorat defeat in Sangamner : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असलेले भाजपचे सुजय विखे पाटील यांनी उमेदवार अक्षय कर्डिलेंना 'गाफिल' न राहण्याचा दिला सल्ला.

Pradeep Pendhare

Rahuri by-election 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. 23 तारखेला मतदान होत आहे. महायुती भाजपकडून प्रचार सभांवर जोर दिला जात आहे. विखे पाटील पिता-पुत्र दोघंही सक्रिय आहेत. अक्षय कर्डिले उमेदवारी करत असले, तरी ही निवडणूक विखे पाटील पिता-पुत्रांनी प्रतिष्ठेची केल्याचे दिसते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, तर प्रचंड सक्रिय झालेले दिसतात. निवडणुकीचे अनुभव शेअर करताना, अक्षय कर्डिलेंना संगमनेर निवडणुकीचा आणि स्वतःच्या पराभवाचा दाखल देत, निवडणुकीत गाफिलपणा नको, असे सूचकपणे सावध केलं आहे.

भाजपचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचंड आक्रमक आहे. त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात बैठकांचा, सपाटा लावला आहे. विखे पाटील यातून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चाचपणी करत असल्याचे काहींचे निरीक्षण आहेत.

भाजपचे (BJP) दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर, होत असलेल्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले उमेदवारी करत आहेत. अक्षय कर्डिले यांचा निवडणुकीचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीची विखे पाटील पिता-पुत्रांनी ही जबाबदारी घेतली आहे. अक्षय कर्डिले यांचे मेहुणे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप देखील सक्रिय आहेत.

अक्षय कर्डिलेंना केलं सावध

महायुती भाजपकडून पोटनिवडणुकीत कोणतीही उणिव न ठेवण्यावर भर दिला जात आहे. असे असतानाच, सुजय विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांना पोटनिवडणूक असली, तरी गाफिलपणा नको, असा सूचक इशारा दिला आहे. यावर विधान करताना, त्यांनी संगमनेरमधील बाळासाहेब थोरात आणि स्वतः लोकसभा निवडणुकीला झालेल्या पराभवाचा दाखला दिला आहे.

माझाही कार्यक्रम लोकांनी फिट केला

सुजय विखे पाटील म्हणाले, "निवडणुकीत गाफिल राहिलो की कार्यक्रम लागतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेरची निवडणूक आहे. संगमनेरमध्ये सेतूवाला आमदार होतो. पण माझाही कार्यक्रम लोकांनी फिट केला. त्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र जनता ऐकायला तयार नव्हती."

संगमनेर, नेवासा अन् पारनेरमध्ये गेलो नसतो

लोकसभा निवडणुकीत मला पाडले नसते, तर मी संगमनेर, नेवासा अन् पारनेर या विधानसभा निवडणुकीत गेलो नसतो. मला पाडण्यासाठी मोठे रिंगण लावले गेले आणि ते यशस्वी झाले, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

खासदार लंकेंना पुन्हा डिवचलं

त्या निवडणुकीत, म्हणजेच लोकसभा निवडणुकीत ‘हिरा’ निवडून आला. तो इतका तेजस्वी आहे की, जिल्ह्यातील कुठल्याही प्रकरणात त्याचेच नाव येते. आता अशोक खरातच्या प्रकरणातही त्याचे नाव दिसते, असे सांगताना विखे पाटील यांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT