Rahuri bypoll news : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले असून, ते शिर्डी विमानतळावरून राहुरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन निघालेले भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मोठं भाष्य केलं.
'तनपुरेंबाबत जो काही निर्णय होईल तो मुख्यमंत्री फडणवीस घेतील, त्यादृष्टीने ते सुदर्शन फिरवतील,' असे सूचक भाष्य प्रा. राम शिंदे यांनी केल्यानं तनपुरेंच्या भूमिकेविषयी फडणवीस कोणता निर्णय घेतात, याची आणखी उत्सुकता वाढली आहे.
राहुरी पोटनिडवणुकीची प्रचार सांगता सभा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित ही सभा होत आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाला मान देत, उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून फडणवीस यासाठी तनपुरेंचा कोणता शब्द पूर्ण करतात, याची उत्सुकता लागली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची थोड्याच वेळात राहुरीत सभा होत असल्याने, तनपुरेंबाबत निर्णयाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातच भाजपचे (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तनपुरेंची त्यांच्या कार्यालयात जात भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी फडणवीसांच्या निर्णयाची उत्सुकता अधिक वाढवली आहे.
राम शिंदे म्हणाले, "माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे काका अरुण तनपुरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत, प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज निवडणुकीत दाखल केलेला नाही. यासाठी त्यांचे आपण जाहीरपणे आभार मानले आहेत. प्राजक्त तनपुरे यांची प्रत्यक्ष भेट घेत, त्यांचे महायुतीकडून पुन्हा आभार मानले."
'अनेक विषयांवर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. या पोटनिवडणुकीकडे पाहात असताना, त्याला भावनिक झालर आहे. केंद्रात अन् राज्यात महायुती भाजप मित्रपक्षांचे सरकार आहे. मतदारसंघाचे प्रश्न सुटण्यासाठी, विकासासाठी केंद्रात अन् राज्यात सत्ता असावी लागते. ती भाजप महायुती मित्रपक्षांची सत्ता आहे. तेच तनपुरेंनी लक्षात घेतलं आहे, अन् यातून ते थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात आहे,' असे राम शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला येत आहे, तेच काय 'सुदर्शन चक्र' फिरवतील, याकडे माझे देखील लक्ष असणार आहे. तनपुरेंना आपण भाजपमध्ये घेण्याचा आग्रह केलेला आहे. पण निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील. यानंतरच खरा निर्णय कळेल, असे राम शिंदे यांनी म्हंटलं.
तनपुरेंना नेमकं काय आश्वासन दिलं आहे, ते तुमच्याबरोबर विधिमंडळाच्या सभागृहात दिसतील का? यावर राम शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाकडे अन् त्यांच्या सुदर्शन चक्रे फिरण्याकडे सूचक बोट दाखवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.