Raj Thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंनी खेळाडूला अडीच तास बसवून ठेवलं, शेवटी भेटलेही नाहीत; स्वतःच सांगितलं खरं काय?

Dilip Gavit Vaijanath Kale : खेळाडूला बसवून ठेऊन भेट न घेतल्याने राज ठाकरेंवर टीका करण्यात येत होती. मात्र, राज ठाकरेंनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Roshan More

Raj Thackeray News : राज ठाकरेंना भेटण्यासाठी नाशिकमधील विश्रामगृहावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित व त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हे आले होते. मात्र, अडीच तास त्यांना बसवून ठेवण्यात आले. अखेर प्रशिक्षकांनी संताप व्यक्त करत भेटायचे नव्हते तर बोलावले कशाला, असा राग व्यक्त करत ते तेथून निघून गेले.

खेळाडूला बसवून ठेऊन भेट न घेतल्याने राज ठाकरेंवर टीका करण्यात येत होती. मात्र, राज ठाकरेंनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही.'

'बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.', असे देखील त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यासाठी गुजरातचे काँट्रॅक्ट

पुढे बोलताना ते म्हणाले, मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT