Raj Thackrey Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या निर्णयावर भुजबळांनी केला 'हा' दावा!

Sampat Devgire

Mahayuti Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करतील.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या घोषणाचे स्वागत केले आहे. ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे हिंदुत्वाला अनुकूल भूमिका व राजकीय वाटचाल सुरू राहील.

ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल, अशा विविध प्रतिक्रिया ठाकरे समर्थकांनी व्यक्त केले आहेत. या घोषणेनंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi नेत्यांनी मात्र अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे NCP नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलू शकते. त्यांच्या या घोषणेचा मतदारांवर परिणाम होईल. महायुतीला अधिक चांगली कामगिरी करता येईल अशी स्थिती आहे.

या संदर्भात भुजबळ म्हणाले, एखादा सामान्य कार्यकर्ता पक्षात प्रवेश करतो त्याचे देखील स्वागत केले जाते. पक्षाला त्याचा निश्चितच फायदा होतो. राज ठाकरे हे तर मनसेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या निर्णयाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महायुतीत त्यांचे सगळ्यांनीच स्वागत केले आहे. विशेषतः आगामी लोकसभा निवडणुकीत Loksabha Election महायुतीच्या उमेदवारांना हा निर्णय उपयुक्त ठरेल.

मनसेचे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले जाते. त्यांचे राजकीय समर्थक असल्याने ठाकरे यांच्या भूमिकेचा समाजावर परिणाम होईल, असेही भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत Loksabha Election कोणतीही जागा मागितलेली नाही. या पक्षाचा कोणीही उमेदवार नसेल त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून महायुतीच्या प्रचारात उतरतील असे बोलले जाते.

Edited BY : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT