Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray politics: राज ठाकरे राज्यभर उमेदवार देणार, नाशिकचे काय?

Raj Thackeray politics; What will happen in Nashik when announcing candidates across the state?-महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

Sampat Devgire

Nashik MNS News: आगामी विधानसभा निवडणुकीची नाशिक शहरात जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आढावा आणि बैठका यावर जोर दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मात्र शांतता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी यंदा स्वबळावर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यातील काही मतदारसंघात उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली.

ज्या नाशिक शहरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पगडा असल्याचा दावा केला जातो, त्या नाशिकमध्ये मनसेचे पदाधिकारी सध्या तरी गोंधळलेले दिसतात. राज ठाकरे यांचा दौरा अद्याप झालेला नाही.

अमित ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. मात्र या दौऱ्यात निवडणुकीबाबत ठोस चर्चा झाली नाही. सध्या तरी नाशिक शहरातील चार पैकी नाशिक पश्चिम या मतदारसंघात दिलीप दातीर यांनी सहा महिन्यांपूर्वीच उमेदवारी करणार असे जाहीर केले आहे. पक्ष त्यांना उमेदवारी देणार अथवा कसे यावर सगळाच गोंधळ आहे.

नाशिकमध्ये विधानसभेपाठोपाठ महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ही अपेक्षित आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीशी मैत्रीची घोषणा केल्यावर इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मनसे सध्या स्वबळावर निवडणुका लढवेल अशी स्थिती नाही.

महायुतीच्या घटक पक्षांच्या मदतीने मनसे काही जागा जिंकून महापालिकेत प्रवेश करेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाची स्थिती काय राहते, यावर पुढील निवडणुका अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकांबाबत मनसे केव्हा घोषणा करते याची पदाधिकाऱ्यांना उत्सुकता आहे

मनसेने २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. त्यानंतर महापालिकेत महापौर देखील याच पक्षाचा झाला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही जागांवर मनसेचे आमदार विजयी झाले होते.

त्यानंतर मात्र २०१७ मध्ये मात्र पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला ओहोटी लागली. पक्षाचे २६ नगरसेवक अन्य पक्षात निघून गेले. त्यानंतर अद्याप मनसे आणि पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना नाशिक शहरात सूर गवसलेला नाही.

मनसेतील या स्थितीला स्थानिक नेत्यांतील गटबाजी हे प्रमुख कारण आहे. खुद्द राज ठाकरे यांनी गटबाजी वरून पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. सध्या मात्र नाशिककडे श्री ठाकरे यांनी दुर्लक्ष केलेले दिसते.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षांची तयारी आणि इच्छुकांची स्पर्धा असताना मनसे पक्षात मात्र थंडा थंडा, कुल कुल अशी स्थिती आहे. आता सगळ्यांनाच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT