Nashik Centre Politics: शिवसेना, काँग्रेस दोघांचा प्रचार सुरू, मात्र मतदारसंघ कोणाचा?

Vasant Gite Politics, Shivsena UBT & Congress start election campaign through house to house visits-महाविकास आघाडीने नाशिक मध्य मतदारसंघात यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची केली आहे.
Vasant Gite, Rahul Dive & MLA Devyani Pharande
Vasant Gite, Rahul Dive & MLA Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Congress News: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. या मतदारसंघात मराठा आरक्षण, मुस्लिम समाज आणि झोपडपट्ट्यांच्या समस्या या तीन घटकांचा राजकीय प्रभाव आहे. महाविकास आघाडीने या तिन्ही घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक मध्य मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार. त्याची विविध लक्षणे निवडणुकीआधीच दिसू लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार, त्यामुळे भाजप अर्थात महायुतीत फारसे इच्छुक नाहीत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडी प्रचंड ताकतीने कामाला लागली आहे.

दोन्ही आघाड्यांचे उमेदवार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. या पक्षाकडे नऊ इच्छुक आहेत.

प्रमुख इच्छुकांमध्ये पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांची नावे आहेत. यामध्ये मतदार नोंदणी पासून तर सध्याच्या नागरिक जनसंवाद यात्रेपर्यंत श्री दिवे यांनी प्रचार केला आहे. त्यांचा हा प्रचार सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील हा मतदारसंघ आमचाच असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहोचविला आहे.

Vasant Gite, Rahul Dive & MLA Devyani Pharande
Dr Satish Patil Politics: राष्ट्रवादीने कोणाला हिणवले? रावेरचा 'तो' गद्दार कोण?

आघाडीच्या घटक पक्षांतील या स्पर्धेमुळे नाशिक मध्य मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याआधी महाविकास आघाडीतच काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार गीते आणि काँग्रेसचे दिवे या दोघांनीही प्रचारात चुरस निर्माण केली आहे.

निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक सुरुवात होईल, तेव्हा या संवेदनशील मतदार संघात फक्त चुरसच नव्हे तर राजकीय तणाव देखील निर्माण होण्याची भीती आहे.

या मतदारसंघात नुकतीच शहर बंद करण्याच्या वादातून दंगल झाली. त्यातून लोकसभा निवडणुकीत दिसून आलेल्या मतदानाचा कल अधिक मजबूत झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून या मतदारसंघातील मतदारांवर परिणाम होणार आहे.

Vasant Gite, Rahul Dive & MLA Devyani Pharande
Girish Mahajan Politics: महाजनांकडून खडसेंचे वस्त्रहरण, म्हणाले, कन्येच्या प्रचारासाठी करताहेत बहाणेबाजी!

लोकसभेतील राज्यघटना बदलण्याचे नॅरेटीव्ह विधानसभेत दिसणार का? हा देखील एक मुद्दा आहे. त्यामुळे या मतदारसंघात सध्या उमेदवारांमध्ये उमेदवारी मिळण्याआधीच प्रचारात चुरस निर्माण झाल्याचे दिसते.

महायुतीचा घटक असलेल्या भाजपच्या आमदार फरांदे दोन टर्म येथे निवडून आल्या आहेत. गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे आणि मतदारसंघावर असलेला वरचष्मा यातून त्या आत्मविश्वासाने या निवडणुकीची तयारी करीत आहेत.

शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी येथून उमेदवारी मागितली आहे त्यांची ही मागणी किती गंभीर हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र यामध्ये सध्या तरी शहरातील चारही मतदारसंघाच्या तुलनेत नाशिकमध्ये हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com